देशातील अग्रगण्य आणि लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आणि प्रामुख्याने कार उत्पादक क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेली मारुती सुझुकी ही कंपनी विशेष कार मॉडेल आणि कमीत कमी किमतीमध्ये दमदार फिचर असलेल्या कार ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओळखले जाते. आजपर्यंत या कंपनीच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेल्या अनेक कार्सना ग्राहकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येते.
ग्राहकांना कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सेफ्टी फीचर्स आणि उत्तम मायलेज येणाऱ्या कार आज पर्यंत या कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आधी याच पद्धतीने आता मारुती सुझुकी बाजारपेठेत नवीन तीन सीएनजी कार आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे.
मारुती मार्केटमध्ये आणणार तीन सीएनजी कार
मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असून लवकरच आपल्या तीन कार सीएनजी आवृत्तीमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे व या तीन कार पैकी दोन कार या एसयूव्ही सेगमेंट मधील असणार आहेत. मारुती सुझुकी सीएनजीमध्ये प्रामुख्याने ब्रेझा आणि फ्रॉँक्स एसयूव्ही आणि त्यासोबत नवीन स्विफ्ट लाँच करण्याचा विचार करत आहे.
एवढेच नाही तर कंपनीच्या माध्यमातून मारुती ब्रेजा सीएनजी आणि मारुती फ्रॉँक्स सीएनजी यांचा टीझर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. जर आपण याबाबत मिळालेल्या अहवालांचा आधार घेतला तर त्यानुसार ब्रिझा आणि फ्रॉँक्सचे सीएनजी मॉडेल स्वयंचलित ट्रान्समिशन सह येण्याची शक्यता असून या कार ट्वीन सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजीसह येऊ शकतात. त्यामुळे या गाड्यांची बूट स्पेस देखील उत्तम राहील व सध्या हे तंत्रज्ञान भारतात फक्त टाटा मोटर्स कडून वापरले जात आहे.
ट्वीन सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान नेमके काय आहे?
सीएनजी कारच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये बूट स्पेसची कमतरता ही एक प्रमुख समस्या आपल्याला दिसून येते. कारण अशा वाहनांमध्ये सीएनजी टाकीमुळे बूट स्पेस शिल्लक राहत नाही. या प्रमुख समस्येवर मात करता यावी याकरिता टाटा मोटर्सने ड्युअल टॅंक सेटअप वापरण्यास सुरुवात केली व या सेटअप iसीएनजी तंत्रज्ञान म्हणतात.
सध्या हे तंत्रज्ञान टाटाच्या टिगोर तसेच टियागो व पंच यासारख्या सीएनजी मॉडेल्समध्ये बघायला मिळते. या तंत्रज्ञानामध्ये मोठ्या इंधन टाकीऐवजी दोन लहान टाक्या दिलेल्या असतात व त्यामुळे बूट स्पेसमध्ये बचत होऊन स्पेस उत्तम मिळतो. टाटा वापरत असलेले तंत्रज्ञान आता मारुती सुझुकी वापरणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला मारुती सुझुकीच्या ब्रेझा तसेच स्विफ्ट या सीएनजी स्वरूपामध्ये पाहायला मिळतील.