मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना परवडतील अशा किमतीतील मॉडेल आतापर्यंत लॉन्च करण्यात आलेली आहेत. जर आपण मारुती सुझुकी इंडियाची आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय कार पाहिली तर ती स्विफ्ट ठरली आहे.
यामध्ये आता मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून नऊ मे 2024 रोजी भारतात स्विफ्ट कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार बघितले तर या नेक्स्ट जनरेशन स्विफ्टला सध्याचे जे काही मॉडेल आहे त्यातून झेड सिरीज मधील 1.2 लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन प्रदान केले जाणार आहे.
तसेच हे नवीन इंजिन सुमारे 40 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देऊ शकणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या नेक्स्ट जनरेशन स्विफ्टमध्ये सहा एअरबॅगसह एडीएएस सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहे.
कसे राहील या नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट कारचे बाहेरील डिझाईन?
जर आपण या नवीन जनरेशन कारचे डिझाईन बद्दल पाहिले तर अगोदरचे जे तिचे जुने स्वरूप होते ते तसेच ठेवण्यात आलेले आहे. परंतु जवळ जाऊन पाहिले तर यामध्ये अनेक नवनवीन डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात. या नवीन डिझाईनमध्ये प्रोजेक्टर सेटअपसह शार्प दिसणारे हेडलॅम्प त्याच्या समोर देण्यात आलेले आहेत.
तसेच यामध्ये इनबिल्ट एलईडी डेटा टाईम रनिंग लॅम्प देखील आहेत. दोन हेडलॅम्पमध्ये गडद क्रोम फिनिश सह पुन्हा डिझाईन केलेले हनी कोंब पॅटर्न ब्लॅक ग्रील ठेवण्यात आलेले आहे. तसेच मारुती सुझुकी या कंपनीचा जो काही लोगो आहे तो आता लोखंडी जाळीच्या वर आणि बोनेटच्या अगदी खाली ठेवण्यात आलेला आहे.
तसेच बंपरमध्ये देखील काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. तसेच 16 इंचाचे अलॉय विल देण्यात आलेले आहेत. तसेच मागच्या बाजूचे जे काही टेललाइट्स आहेत त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. म्हणजेच ते आता पूर्वीपेक्षा लहान आणि स्पोर्ट इयर आहेत. या नवीन स्विफ्टचा व्हिलबेस 2450 mm च्या आउटगोइंग मॉडेल प्रमाणे आहे.
कसे आहे या नेक्स्ट जनरेशन स्विफ्टचे आतील डिझाईन म्हणजेच इंटेरियर?
कंपनीने या नवीन कारच्या आतील भागात काही बदल केले आहेत. या नवीन कारमध्ये ब्लॅक अँड व्हाईट ड्युअल टोन थीमसह सर्व नवीन डॅशबोर्ड लेआउट देण्यात आला आहे.
तसेच यामध्ये नऊ इंच फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम, स्लीक एसी व्हेंट्स आणि तळाशी HVAC कंट्रोलसह नवीन डॅशबोर्ड लेआउट मिळतो. तसेच वायरलेस एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, कनेक्ट केलेले कार टेक्नॉलॉजी, स्टेअरिंग माउंट केलेले कंट्रोल आणि स्वयंचलित हवामान नियंत्रण यांचा समावेश आहे.
देण्यात आले आहे नवीन Z सिरीजचे पेट्रोल इंजिन
या नवीन कारमध्ये झेड सिरीजचे नवीन 1.2- लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल व हे इंजिन 90 एचपी पावर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. या नवीन स्विफ्टचे ट्रान्समिशन डिटेल्स कसे आहे ते समोर आलेले नाही. परंतु त्यात पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअर बॉक्सचा पर्याय असेल अशी अपेक्षा आहे.
त्याचवेळी हे सीएनजी आणि हायब्रीड इंजिन पर्यायांचा देखील वापर केली जाण्याची शक्यता आहे.या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा आणि ड्युअल सेंसर ब्रेक सपोर्ट, ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम आणि कोलीजन मिटीगेशन ब्रेकिंग सिस्टम यासारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
किती असेल किंमत?
जर आपण या कारच्या सध्याच्या मॉडेलची किंमत पाहिली तर ती पाच लाख 99 हजार( एक्स शोरूम ) रुपये पासून सुरू होते. परंतु आता या नवीन जनरेशन स्विफ्टमध्ये नवीन डिझाईन आणि काही वैशिष्ट्ये समाविष्ट केल्यानंतर तिची किंमत 6.3 लाख रुपये( एक्स शोरूम ) पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.