मोठी बातमी ! मारुती सुझूकी लाँच करणार ‘या’ 3 नवीन इलेक्ट्रिक कार, वाचा याच्या विशेषता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Upcoming Electric Car : मारुती सुझुकी ही देशातील एक प्रतिष्ठित ऑटो कंपनी आहे. ही कंपनी देशात सर्वाधिक कार विक्री करणारी एकमेव कंपनी आहे. मात्र असे असले तरी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये मारुती सुझुकी अजूनही पिछाडीवर आहे. सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनाची मागणी वाढत आहे. ग्राहक आता इलेक्ट्रिक कार वापरणे पसंत करत आहेत.

याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे एकतर सीएनजी किंवा मग इलेक्ट्रिक कार घेण्याकडे आता ग्राहकांचा ओघ आहे. पण सध्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वन अँड ओन्ली टाटा कंपनीचा दबदबा आहे. टाटा कंपनीची इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये 75 टक्के हिस्सेदारी असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

विशेष म्हणजे दिवसेंदिवस टाटा मोटर्स आपल्या इलेक्ट्रिक सेगमेंट मधला पोर्टफोलिओ मजबूत बनवत आहे. टाटा येत्या काही वर्षात आणखी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटाची मक्तेदारी मोडणे कोणाला जमणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अशातच आता टाटा कंपनीला इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये कडवी झुंज देण्यासाठी मारुती सुझुकी ही कंपनी कंबर कसून तयार झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी ही कंपनी येत्या तीन वर्षात तीन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

यामुळे मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये जोरदार एन्ट्री होणार आहे. निश्चितच, मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी राहणार आहे. दरम्यान आता आपण मारुती सुझुकी येत्या तीन वर्षात कोणत्या नवीन हॅचबॅक आणि SUV इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मारुती eVX SUV : मारुती सुझुकी लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपली पहिली-वहिली गाडी लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी च्या माध्यमातून SUV eVX ही इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. या गाडीसह भारतात कंपनी EV सेगमेंट मध्ये हजेरी लावणार आहे.

ही आगामी मारुतीची इलेक्ट्रिक कार 5 सीटर राहणार अशी शक्यता आहे. ही कार बाजारात Hyundai Creta आणि Harrier EV ला टक्कर देईल असे बोलले जात आहे. ही कंपनीची अपकमिंग इलेक्ट्रिक कार, मारुती eVX सुमारे 550 किमीची कमाल रेंज देण्यास सक्षम राहणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.

मारुतीची इलेक्ट्रिक MPV (YMC) : मारुती सुझुकी मोठ्या कौटुंबिक ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी बॉर्न-EV आर्किटेक्चरवर आधारित ही नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ही कंपनीची अपकमिंग इलेक्ट्रिक कार टोयोटाद्वारा संयुक्तपणे विकसित केली जाणार आहे.

ही कंपनीची पहिलीच इलेक्ट्रिक MPV राहणार आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर ही गाडी सप्टेंबर 2026 मध्ये लॉन्च होणार असा अंदाज आहे. तथापि याबाबत आत्तापासूनच सांगणे थोडे कठीण आहे. मात्र ही गाडी 2026 पर्यंत नक्कीच बाजारात उतरेल अशी आशा व्यक्त होत आहे.

सुझुकी स्मॉल इलेक्ट्रिक हॅच (K-EV) : मारुती मध्यमवर्गीय ग्राहकांची गरज देखील पूर्ण करणार आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून कमी किमतीची इलेक्ट्रिक कार मारुती सुझुकी आगामी काळात लॉन्च करणार आहे. मॉड्युलर इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर (K-EV) कमी किमतीची EV विकसित करण्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. हे मॉडेल भारतात 2026-27 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. या कारची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी राहणार असा दावा होत आहे.