मारुती सुझुकीची वॅगनआर कार ‘या’ ग्राहकांना मिळेल 1 लाख रुपयांनी स्वस्त! मारुतीने या कारला केले करमुक्त, वाचा डिटेल्स

Ajay Patil
Published:
Maruti Suzuki Wagon R Car

भारतामधील जर आपण प्रमुख कार उत्पादक कंपन्यांची यादी पाहिली तर यामध्ये मारुती सुझुकी या कंपनीचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते. गेल्या कित्येक वर्षापासून मारुती सुझुकीने कार बाजारपेठेमध्ये स्वतःचा नावाचा एक दबदबा निर्माण केलेला आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक कार मॉडेल आत्तापर्यंत बाजारपेठेत सादर करण्यात आले असून अगदी सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा कार देखील मारुती सुझुकीने लॉन्च केल्याचे आपण पाहिले आहे.

ग्राहकांचे हित सर्वतोपरी जपण्याकडे या कंपनीचा कायमच कल दिसून आल्याने या कंपनीचा ग्राहक वर्ग देखील मोठा आहे. जवळपास मारुती सुझुकी कंपनीच्या सर्वच कार मॉडेल ग्राहकांमध्ये खूपच पसंतीस उतरले असून या मॉडेल मधील मारुती वॅगनआर ही कार देखील गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे.

याच कारच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली असून मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून या वॅगनआर कार वरील जीएसटी कमी करण्यात आलेला आहे. कंपनीच्या माध्यमातून ही सुविधा फक्त काही खास ग्राहकांना दिली जाणार आहे.

 मारुती सुझुकी वॅगनआर या ग्राहकांना मिळेल स्वस्तात

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मारुती सुझुकी कंपनीने त्यांच्या वॅगनआर या कार वरील जीएसटी कमी केला असून ही सुविधा कंपनीच्या माध्यमातून काही खास ग्राहकांना दिली जात आहे.

कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट अर्थात सीएसडी कडून जे ग्राहक कार खरेदी करतील त्यांना ही सुविधा स्टोअर्स मधून अनेक गाड्यांची विक्री केली जाते व यामध्ये प्रमुख ग्राहक हे लष्कराचे जवान असतात. कॅन्टीन स्टोअर्स डिपारमेंट कडून ज्या कार विकल्या जातील त्यांच्यावर आता 28% ऐवजी फक्त चौदा टक्के कर आकारला जातो.

 कॅन्टीन स्टोअर्स डिपारमेंट कडून कार खरेदी केल्यावर किती होईल फायदा?

जर आपण मारुती सुझुकी वॅगनआर या कारची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती पाच लाख 54 हजार पाचशे रुपयांपासून सुरू होते. परंतु हीच कार कॅन्टीन  डिपार्टमेंट कडून खरेदी केली तर तिची किंमत चार लाख 63 हजार 165 रुपयांपासून सुरू होते.

म्हणजेच या कारची एक्स शोरूम किंमत आणि सीएसडी म्हणजेच कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंटची किंमत यामधील तफावत पाहिली तर ती तब्बल 91 हजार 335 रुपयांची आहे. तसेच वॅगन आर या कारचे इतर व्हेरियंट  पाहिले तर त्यामध्ये हा फरक एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

उदाहरणच द्यायचे झाले तर मारुती सुझुकी वॅगनआरच्या 1.0- लिटर पेट्रोल एएमटी प्रकाराबद्दल पाहिले तर WagonR VXI ची एक्स शोरूम किंमत सहा लाख 49 हजार 500 रुपये आहे. परंतु कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट मध्ये या कारची किंमत पाच लाख 42 हजार 80 रुपये असून या दोन्ही किमतींमध्ये तब्बल एक लाख 7 हजार 420 रुपयांचा फरक आहे.

 काय आहेत मारुती सुझुकी वॅगनआर कारची वैशिष्ट्ये?

या कारमध्ये प्रगत K सिरीज इंजिन देण्यात आले असून ही कार 1.0- लेटर पेट्रोल एमटी व्हेरियंटमध्ये 24.35 kmpl चे मायलेज देते तर 1.0- लिटर पेट्रोल एजीएस वेरियंट 25.19 kmpl मायलेज देण्यामध्ये सक्षम आहे.

तसेच ही कार एक लिटर सीएनजी प्रकारामध्ये तब्बल 30.47 पर किलो ग्रॅम पर किमी मायलेज देते. तसेच या कारमध्ये ऑटो गिअर शिफ्टची सुविधा देण्यात आली असून स्मार्ट प्ले स्टुडिओ व स्मार्टफोन नेवीगेशनचे सुविधा देखील देण्यात आली आहे. याशिवाय अनेक सुविधा देखील या कारमध्ये आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe