Massey Ferguson 9500 Tractor: शेतीकरिता मॅसी फर्ग्युसनचे ‘हे’ ट्रॅक्टर घ्याल तर रहाल फायद्यात! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Massey Ferguson 9500 Tractor:- भारत हा कृषीप्रधान देश असून भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतीय शेती आता प्रगत झाली असून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची यंत्र आणि तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्ये होऊ लागला आहे.

यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून शेतीमध्ये यंत्र वापरायला प्राधान्य मिळावे व शेतकऱ्यांना यंत्र खरेदी करता यावी त्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारांच्या देखील अनेक योजना कार्यान्वित आहेत. या यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ट्रॅक्टर हे  यंत्र शेती कामामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे यंत्र आहे व त्यामुळेच शेतकरी चांगला परफॉर्मन्स असणारे आणि परवडणारे किमतीत खरेदी करता येऊ शकेल अशा ट्रॅक्टरच्या शोधात असल्याचे आपल्याला दिसून येते.

भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर मॉडेल्स असून आपल्या बजेट आणि परिस्थितीनुसार शेतकरी ट्रॅक्टरची खरेदी करतात. त्यामध्ये जर आपण पाहिले तर मॅसी फरगुशन 9500 स्मार्ट ट्रॅक्टर हा एक शेतकऱ्यांसाठी शेती करिता उत्तम पर्याय असू शकतो. याच ट्रॅक्टरची माहिती आपण या लेखात बघू.

 मॅसी फरगुशन 9500 स्मार्ट ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

या ट्रॅक्टरमध्ये 2700 सीसी क्षमतेसह तीन सिलेंडर मध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले असून ते 58 एचपी पावर जनरेट करते. कंपनीचा हा ट्रॅक्टर ड्राय एअर फिल्टर सहित येतो. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 56 एचपीची आहे व हा ट्रॅक्टर 35.8/ 31.3 किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे येतो.

या ट्रॅक्टरची हायड्रोलिक पावर 2560 किलो वजनाचे आहे. या ट्रॅक्टरला पावर स्टेरिंग देण्यात आलेली असून या ट्रॅक्टरमध्ये आठ फॉरवर्ड अधिक दोन रिव्हर्स/ आठ फॉरवर्ड अधिक आठ रिवर्स गिअर सह गिअरबॉक्स येतो. या स्मार्ट सिरीजच्या ट्रॅक्टर मध्ये डुएल क्लच देण्यात आला असून तो कॉमफिमेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह येतो.

या ट्रॅक्टरला ऑइल एमर्स ब्रेक्स देण्यात आली असून ते टायर्स वर चांगली पकड ठेवतात. तसेच सत्तर लिटर क्षमतेची इंधन टाकी यामध्ये देण्यात आलेली आहे. हा ट्रॅक्टर 2WD ड्राईव्ह मध्ये येतो. तसेच या ट्रॅक्टरला स्मार्ट बनवण्यासाठी स्मार्ट हेड लॅम्प, स्मार्ट की, स्मार्ट क्लस्टर, मॅट फूट स्टेप, नवीन ग्लास डिफ्लेक्टर, सहाय्यक पंप आणि स्पूल हॉल्व्ह इत्यादी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

मॅसी फरगुशन 9500 स्मार्ट ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत नऊ लाख वीस हजार ते नऊ लाख 75 हजार रुपये असून या दोन व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेले रोड टॅक्स यामुळे बदलू शकते. या ट्रॅक्टरला पाच वर्षाची वारंटी प्रदान करण्यात आली आहे.