Ola Electric Scooter:- सध्या भारतीय वाहन बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून अनेक कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक्स आणि कार्स उत्पादित केल्या जात असून लॉन्च देखील करण्यात येत आहेत.
आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान दिले जाते व त्यामुळे येणाऱ्या कालावधीत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने दिसतील यात शंकाच नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर व एकंदरीत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील ही इलेक्ट्रिक वाहने खूप फायद्याचे ठरतील.
त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापराकडे देखील ग्राहकांचा कल वाढल्याचे आपल्याला दिसून येते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर मोठ्या प्रमाणावर सध्या भारतामध्ये केला जात असून त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर निर्मिती क्षेत्रातील ओला सारख्या कंपन्यांनी आतापर्यंत अनेक नवनवीन स्कूटर बाजारपेठेत लॉन्च केलेल्या आहेत व नुकत्याच ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर Gig आणि S1 Z लॉन्च केले आहेत.
या दोन्ही इलेक्ट्रिस स्कूटर प्रत्येकी दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आलेले असून यामध्ये ओला Gig आणि Gig+ आणि त्यासोबतच ओला S1 Z आणि S1 Z+ यांचा समावेश आहे. दैनंदिन वापराकरिता या इलेक्ट्रिक स्कूटर खूप फायद्याच्या ठरतील. दोन्ही स्कूटर प्रामुख्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक वापराच्या दृष्टिकोनातून वापर करता येईल त्या पद्धतीने डिझाईन केलेले आहेत.
काय आहेत ओला गिग आणि गिग+ ची वैशिष्ट्ये?
ओला गिग ही बेयरबोन्स इलेक्ट्रिक स्कूटर असून यामध्ये कंपनीने कुठल्याही प्रकारचा पॅनल आणि एन्फोटेनमेंट डिस्प्ले दिलेला नाही. समोर सिंगल एलईडी हेडलाईट देण्यात आला असून सिंगल सीट आणि मागच्या बाजू स्टोरेज रॅक देण्यात आला आहे. ओला गिग हे स्लो स्पीड स्कूटर असून त्यामध्ये 250 वॅटची मोटर देण्यात आलेली आहे व चार्जिंगकरिता सिंगल 1.5kWh पोर्टेबल बॅटरी देण्यात आलेली आहे.
याबाबत कंपनीने दावा केला आहे की स्टॅंडर्ड फुल चार्ज केल्यावर 112 किलोमीटर प्रवास करते आणि तिचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास इतका आहे. तसेच गिग+ चे वैशिष्ट्य पाहिले तर यामध्ये एक समोर पॅनल दिलेला आहे व एलसीडी स्क्रीन आणि एक सिंगल सीट व मागच्या बाजूला स्टोरेज रॅक दिलेला आहे.
उत्तम परफॉर्मन्ससाठी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 1.5 किलो वॉटची मोटर देण्यात आलेली असून जे चार्जिंगसाठी 1.5kWh बॅटरी पॅक सह वाढवली जाऊ शकते. Gig+ एका बॅटरी पॅकसह 81 किलोमीटर व दोन बॅटरी पॅक सह पूर्ण चार्ज केली तर 157 किलोमीटर जाऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 45 किमी प्रतितास इतका आहे.
ओला S1 Z आणि S1 Z+ इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये
ओला इलेक्ट्रिकने S1 Z हे प्रामुख्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक वापराकरिता डिझाईन केलेली स्कूटर असून यामध्ये सर्वांगीण एलईडी लाईट देण्यात आलेले आहे. या स्कूटरच्या दोन्ही प्रकारांमध्ये हे वैशिष्ट्य उपलब्ध आहेत.
या दोन्ही प्रकारांमधील जर प्रमुख फरक पाहिला तर तो ॲक्सेसरीजमध्ये आहे. यात स्टॅंडर्ड मॉडेल S1 Z मध्ये दुहेरी सीट देण्यात आले आहे तर S1 Z+ या वेरियंटमध्ये समोरच्या आसनाचा एकच सीट आणि मागील सीटवर स्टोरेज रॅक देण्यात आलेला आहे.
तसेच या स्कूटरच्या दोन्ही प्रकारांमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी मागील चाकांवर तीन किलो वॅट पावरसह हब मोटर देण्यात आलेली आहे. या स्कूटरबद्दल कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 4.7 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडू शकते.
यात स्कूटरचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रतितास इतका आहे. तसेच यामध्ये एलसीडी स्क्रीन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आलेली आहे.ही बॅटरी चार्ज करण्यासाठी 1.5kWh चा एकच स्वॅप करणे योग्य बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या स्कूटरची रेंज जर बघितली तर एक बॅटरी पॅकसाठी 75 किलोमीटर व दुहेरी बॅटरी पॅकसह 146 किलोमीटर इतकी आहे.
किती आहे या स्कूटरची किंमत?
1- ओला Gig- या स्कूटरची किंमत 39 हजार 999 रुपये आहे.
2- ओला Gig+- या स्कूटरची किंमत 49 हजार 999 रुपये आहे.
3- ओला S1 Z- या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 59999 रुपये आहे.
4- ओला S1 Z+- या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 64 हजार 999 रुपये आहे.
( या सर्व किमती एक्स शोरूम असून सिंगल बॅटरी व्हेरियंटच्या आहेत.)