Ola S1 X : ओलाचा धमाका! लॉन्च झाल्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, ‘इतक्या’ स्वस्तात येतील खरेदी करता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ola S1 X : ओला ही भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. आज कंपनीने आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 5 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. ज्या तुम्हाला यावर मिळणाऱ्या ऑफरमुळे स्वस्तात खरेदी करता येईल.

कंपनीने आपले नवीन मॉडेल OLA S1X लाँच केले आहे, ज्याची सुरुवातीची किंमत फक्त रुपये 89,999 (एक्स-शोरूम) इतकी आहे. यामध्ये कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. तसेच तुम्हाला 151 किलोमीटरपर्यंत रेंज मिळेल. जाणून घ्या सवलत आणि किंमत.

जाणून घ्या OLA S1X किंमत

कंपनीने OLA S1X एकूण तीन प्रकारांत सादर केली आहे, ज्यामध्ये S1X, S1X (3kWh) आणि S1X (2kWh) यांचा समावेश असणार आहे. किमतीचा विचार केला तर या स्कुटरची किंमत अनुक्रमे 1,09,999 रुपये, 99,999 रुपये आणि 89,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. जर तुम्हाला ही स्कुटर कमी किमतीत खरेदी करायची असेल तर तुम्ही 21 ऑगस्टपूर्वी त्या बुक केल्यास त्यांची किंमत अनुक्रमे 99,999 रुपये, 89,999 रुपये आणि 79,999 रुपये इतकी असणार आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 151 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. नवीन स्कुटरचा टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर इतका आहे. S1X श्रेणीसाठी बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. S1 X ची डिलिव्हरी सप्टेंबरपासून, S1 X 3kWh आणि S1 X 2kWh च्या डिलिव्हरी डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Ola S1 सीरिज

कंपनीकडून Ola S1 सीरिजमधील इलेक्ट्रिक स्कूटरची दुसरी पिढी लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये काही अपडेट्स दिले असून त्याच्या साइड फ्रेममध्ये आता 22 ऐवजी 6 घटक असणार आहेत, जे 70 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे स्कूटरची ताकद वाढली आहे असा कंपनीने दावा केला आहे. OLA नुसार स्कूटरची कार्यक्षमता 30% ने वाढली असून थर्मल परफॉर्मन्समध्ये 25% सुधारणा, 25% किमतीत घट, सर्वसाधारणपणे 11% कमी घटक, 7% कमी ऊर्जा वापरली जाईल.

कंपनीने नवीन लिथियम बॅटरी पॅक (4680 Li-ion) प्रदर्शित केला आहे. येत्या काळात कंपनी त्याचा वापर करू शकते. भारतातील सर्वात मोठी बॅटरी उत्पादन सुविधा उभारली असल्याचा कंपनीचा दावा आहे.