Top Force Tractor: फोर्स कंपनीचे ‘हे’ ट्रॅक्टर शेतातील अवघड कामे करतील सोपे! घ्याल तर रहाल फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top Force Tractor:- आपल्याला माहित आहे की शेतकरी आता ट्रॅक्टरचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर करू लागले असून शेतीची अनेक प्रकारचे कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचतो.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे बरेच अंतरमशागती करिता विकसित करण्यात आलेली यंत्रे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे देखील ट्रॅक्टरचा वापर हा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. यामुळे शेतीकामासाठी शक्तिशाली ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकरी कायम आग्रही असतात व अशाच ट्रॅक्टरची निवड शेतकरी करत असतात.

जर तुम्हाला देखील शेतीकामासाठी असाच पावरफुल ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर तुम्ही फोर्स कंपनीचे ट्रॅक्टर विकत घेऊ शकतात. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण फोर्स कंपनीचे काही लोकप्रिय ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत. त्या ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची देखील चांगली मागणी आहे.

 हे आहेत फोर्स कंपनीचे पावरफूल ट्रॅक्टर

1-फोर्स सन्मान 5000 ट्रॅक्टर या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला चार स्ट्रोक आणि तीन सिलेंडर मध्ये इंटर कुलर इंजिनसह इन लाईन डायरेक्ट इंजेक्शन टर्बो चार्जर, 45 एचपी पावर निर्माण करते. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 38.7 एचपी असून या ट्रॅक्टरची इंजन 2200 चे आरपीएम जनरेट करते.

या ट्रॅक्टरमध्ये 54 लिटर क्षमतेची इंधन टाकी येते. सध्याचे हायड्रोलिक क्षमता 1450 किलोग्राम इतकी ठेवण्यात आली असून कंपनीच्या माध्यमातून हा ट्रॅक्टर 2032 एमएम व्हीलमध्ये तयार करण्यात आला आहे. तसेच यामध्ये पावर स्टेरिंगसह आठ फॉरवर्ड+ चार रिव्हर्स गिअर्ससह गिअर बॉक्स आहे.

हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्ह मध्ये येतो. फोर्स सन्मान 5000 ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सात लाख 16 हजार ते सात लाख 43 हजार रुपयांपर्यंत आहे व त्यासोबत कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरसह तीन वर्षाची वारंटी देण्यात येते.

2- फोर्स बलवान 450 ट्रॅक्टर या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला १९४७ सीसी क्षमतेचे  3 सिलेंडर वॉटर कुल्ड इंजिन पाहायला मिळते. ते 45 एचपी पावर जनरेट करते व या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 38.7 एचपी आहे. हा ट्रॅक्टर साठ लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह येतो तसेच या ट्रॅक्टरचे इंजिन 2500 आरपीएम जनरेट करते.

ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 1350 ते 1450 किलोग्राम इतकी आहे. या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला मेकॅनिकल/ पावर( पर्यायी) स्टेरिंगसह आठ फॉरवर्ड+ चार रिव्हर्स गिअरसह एक गिअरबॉक्स पाहायला मिळतो.

या ट्रॅक्टरमध्ये फुली ऑइल एमर्स मल्टिप्लेक्स सील केलेले डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येतो. या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत पाच लाख 50 हजार रुपये इतकी असून या ट्रॅक्टर सह कंपनी तीन वर्षांची वारंटी देते.

3- फोर्स ऑर्चर्ड मिनी ट्रॅक्टर या ट्रॅक्टरमध्ये 1947 सीसी क्षमतेचे तीन सिलेंडर वॉटर कूल्ड इंजिन आहे. जो 27 एचपी पावर जनरेट करते व या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 23.2 एचपी आहे. तसेच या ट्रॅक्टरचे इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते.

या ट्रॅक्टरला २९ लीटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली असून याची लोडिंग क्षमता म्हणजेच हायड्रोलिक पावर 950 किलो इतकी आहे. या ट्रॅक्टरमध्ये सिंगल ड्रॉप आर्म मेकॅनिकल स्टेरिंग सह आठ फॉरवर्ड+ चार रिव्हर्स गिअर सह एक गिअरबॉक्स पाहायला मिळतो.

फोर्स कंपनीचा हा मिनी ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्ह मध्ये येतो. फोर्स ऑर्चर्ड मिनी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत पाच लाख ते पाच लाख वीस हजार रुपये इतकी असून कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरसह तीन हजार तास किंवा तीन वर्षाची वारंटी येते.