तुमचा देखील जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन आहे का? अशी कार खरेदी करण्यासाठी कोणती असते योग्य वेळ? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
used car buying tips

आर्थिक बजेटच्या कमतरतेमुळे एखाद्या वेळेस कार तर घ्यायची असते, परंतु नवीन कार खरेदी करणे शक्य होत नाही व त्यामुळे बरेच जण जुनी कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. जुनी कार खरेदी केल्यामुळे आपल्या बजेटमध्ये ती मिळतेच. परंतु आपले कारचे स्वप्न किंवा कार घेण्याचे समाधान देखील पूर्ण होते. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे जुने वाहन खरेदी करतो त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेणे गरजेचे असते.

नाहीतर अशा व्यवहारामध्ये आपले पैसे वाया जाण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे जुनी कार खरेदी करण्याअगोदर तुम्ही त्या संबंधित थोडा रिसर्च म्हणजेच तपास करणे खूप गरजेचे आहे. कारण जुन्या कार बाजारपेठेचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला खूप कमी किलोमीटर चाललेल्या गाड्या देखील स्वस्त मिळू शकतात.

परंतु अशा गाड्यांचा शोध घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणे खूप गरजेचे असते. तसेच जुनी कार खरेदी करताना तुम्ही योग्य टाइमिंगला खरेदी केली तर फायदा होतो. योग्य कालावधीत जुनी कार खरेदी करण्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कार मिळतेच परंतु उत्तम कंडीशन असलेली कार घेण्यात तुम्ही यशस्वी ठरतात.

 जुनी कार खरेदी करायची असेल तर सगळ्यात अगोदर एखाद्या कार कंपनीच्या डीलरशी संपर्क साधा

तुमच्या मनात आले की आता जुनी कार खरेदी करायचे आहेत तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या जवळपास एखाद्या कार कंपनीच्या डीलरशी संपर्क साधने गरजेचे आहे. कारण अशा डीलर कडून तुम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी आलेली कार स्वस्त दरामध्ये विकत घेऊ शकतात व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या प्रकारच्या गाड्या या अगदी व्यवस्थित व कंडिशनमध्ये असतात व त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड असत नाही.

कारण अशा प्रकारच्या कार या डीलर कडे फक्त ग्राहकांना टेस्ट ड्राईव्ह देण्यासाठी ठेवण्यात आलेले असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गाड्या जास्तीत जास्त सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या जुन्या असू शकतात व तुम्हाला त्या अर्ध्या किमतीत विकत मिळण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला जर जुनी कार घ्यायची असेल तर चालवलेल्या कार ऐवजी टेस्ट ड्राईव्हला आलेली कार जर खरेदी केली तर फायदा मिळतो म्हणून हा पर्याय चांगला असतो.

 वर्षाखेरीस जुनी कार घ्यावी

जेव्हा वर्ष संपायची वेळ येते किंवा वर्ष संपत असते तेव्हा अनेक कार कंपन्या त्यांच्या गाड्यांवर अनेक डिस्काउंट जाहीर करतात. कारण या मागील महत्त्वाचं कारण म्हणजे 31 डिसेंबर नंतर या कार एक वर्ष जुन्या होत असतात व त्यामुळे बऱ्याच कार उत्पादक कंपन्या हा स्टॉक लवकरात लवकर विक्री करून स्टॉक क्लिअर करण्यामागे असतात व त्यामुळे अशा कारची विक्री होण्यासाठी डिस्काउंट देतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊन कमी किमतीत कार खरेदी करू शकतात.

 सणासुदीच्या कालावधीमध्ये कार घ्या

दिवाळी सारख्या सणाच्या आसपास जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार केला तर यावेळी तुम्ही फायद्यात राहू शकतात. कारण अशा सणासुदीच्या कालावधीमध्ये तुम्हाला कंपन्यांच्या माध्यमातून अनेक ऑफर दिल्या जातात व यामध्ये तुम्ही कॅशबॅकसह लॉयल्टी बोनस व एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

परंतु अशावेळी तुम्हाला फक्त वेगवेगळ्या कंपन्यांच्या कुठल्या ऑफर आहेत त्या ऑफर्समध्ये तुलना करून जी ऑफर तुम्हाला जास्तीत जास्त आर्थिक फायदा करून देईल त्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात जुनी नाहीतर नवीन कार देखील आणू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe