Second Hand Car: सेकंड हॅन्ड कार घ्यायचा विचार करत आहेत का? तर अगोदर थांबा आणि हे वाचा!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Second Hand Car:- आज-काल बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा असते की आपली स्वतःची एक कार असावी व याकरिता अनेक जण आपल्याला प्रयत्न करताना देखील दिसून येतात. परंतु प्रत्येकच व्यक्तीला आपल्या स्वतःच्या कारचे स्वप्न पूर्ण करता येईल असे नसते.

साधारणपणे तुम्ही कोणतीही कार घ्यायला गेलात तर तिची किंमत ही चार ते पाच लाखाच्या पुढेच असते. त्यामुळे बरेच व्यक्ती हे नवीन कार ऐवजी आपले कारचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता सेकंड हॅन्ड कार विकत घेण्याचा पर्याय निवडतात. तसे पाहायला गेले तर बऱ्याच आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून सेकंड हॅन्ड कार विकत घेण्याचा निर्णय हा बऱ्याच अंशी फायद्याचा असतो.

परंतु सेकंड हॅन्ड कार म्हणजेच वापरलेली कार विकत घेण्याअगोदर आपण काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. नाहीतर आपले कारचे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादामध्ये आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते. या अनुषंगाने सेकंड हॅन्ड गाडी विकत घेताना नेमकी कोणत्या गोष्टी तपासून पहाव्यात? त्याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 सेकंड हॅन्ड कार घेण्याअगोदर या गोष्टींची घ्या काळजी?

1-  गाडीची तपासणी करा तुम्ही सेकंड हॅन्ड कार पाहायला गेलात तर अगोदर ती कार किंवा गाडी तुम्हाला आवडली तर ती गाडी तुम्ही आतून आणि बाहेरून प्रत्येक अँगलने ती तपासून घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहिती असतील तर त्या सर्व आवश्यक गोष्टी तुम्ही स्वतः पडताळून पाहणे गरजेचे आहे.

तुम्हाला जर त्यामधील काही कळत नसेल तर तुम्ही तुमच्या ओळखीच्या एखाद्या मेकॅनिकलला बोलावून सर्व माहिती घेऊ शकतात. जरी संबंधित गाडी वरून आपल्याला चांगली वाटत असली तरी  मेकॅनिक किंवा गाडीच्या विषयी तांत्रिक माहिती असलेल्या व्यक्तीला आतील काही दोष लगेच समजू शकतात.

त्यामुळे गाडी घेतल्यानंतर तुम्हाला जो काही त्रास होण्याची संभाव्य शक्यता असते ती होत नाही. तसेच कारच्या आतल्या  भागामध्ये सीट फाटले तर नाही ना किंवा त्यावर कुठे डाग तर नाहीत ना या गोष्टी देखील बघाव्यात. तसेच सर्व सिस्टम व सीटबेल्ट सारख्या गोष्टी देखील तपासून पहाव्यात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गाडीचे टायर्स आणि इंजिन चेक करून घेणे गरजेचे असते.

2- लगेच गाडी आवडली हे दाखवू नका तुम्हाला जर गाडी घ्यायची आहे व तुम्हाला ती कितीही अत्यावश्यक असले तरीही तुम्ही अगोदर जेव्हा पहिल्यांदा गाडी बघाल तेव्हा लागलीच त्याला पसंती देऊ नका. तुम्हाला जर एखादी गाडी आवडली तरी त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही गाड्या पहा.

म्हणजेच तुम्हाला आवडलेल्या अगोदरच्या गाडीची या इतर गाडिशी तुलना करता येईल. एखादी गाडी तुम्हाला आवडली तर ती नेमकी बाहेरून कशी दिसते यावर तिचा आवडीचा निर्णय न घेता ती गाडी किती चालवली गेली आहे व तिचे मॉडेल कधीचे आहे इत्यादी गोष्टी देखील तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे.

3- गाडी स्वतः ड्राईव्ह करणे तुम्ही कोणतीही जुनी गाडी खरेदी करत असाल तर तिला तुम्ही स्वतः वापरून किंवा चालवून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तुम्ही गाडी चालवल्यानंतर तुम्हाला लागलीच कळून येते की यामध्ये काही गडबड आहे की नाही किंवा ती व्यवस्थित चालत आहे की नाही?

समजा तुम्ही एक राऊंड गाडीचा घेतला व त्यामध्ये तुम्हाला काही समजले नाही तर तुम्ही दोन ते तीन वेळेस गाडी चालवून पाहणे गरजेचे आहे. तेव्हा देखील जर तुम्हाला या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या नाही असे वाटले व खात्री झाली तरच निर्णय घ्यावा.

4- गाडीचा मेंटेनन्स पाहणे जे व्यक्ती गाडी विक्रीसाठी आणतात ते नेहमी सर्विसिंग किंवा दुरुस्त करून आणत असतील तर त्यांच्याकडे गाडीच्या मेंटेनन्स ची बिले असतात व ही बिलांवरून गाडीची स्थिती कशी आहे याचा तुम्हाला अंदाज बांधता येतो.

5- रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट चेक करणे गाडीच्या बद्दल या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संबंधित गाडी किंवा कारचे सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन म्हणजेच आरसी तपासून पहावे. गाडीच्या आरसी मध्ये त्या गाडीच्या मालकाचे नाव आणि इंजिन संबंधित संपूर्ण माहिती दिलेली असते.

तसेच गाडीची आरसी खरी आहे की बनावट याची देखील खात्री करणे गरजेचे आहे. यामध्ये जर डुबलीकेट आरसी असेल तर त्यावर डीआरसी असे लिहिलेले तुम्हाला दिसू शकते. जर डीआरसी असे लिहिलेले असेल तर तुम्ही संबंधित व्यक्तीला ओरिजनल आरसी कुठे आहे किंवा त्याबद्दल माहिती घेऊ शकतात किंवा विचारपूस करणे गरजेचे आहे.

याशिवाय तुम्ही इन्शुरन्स, वाहनाचे इन्व्हाईस, रोड टॅक्स रिसीट तसेच प्रदूषण सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे तपासून पहावे. तसेच त्या गाडीच्या फायनान्सिंग कंपनीचे एनओसी घेणे देखील महत्त्वाचे आहे.