Solis 5024 S 4WD Tractor: जपानी तंत्रज्ञानाने बनवलेले ‘हे’ आहे शक्तिशाली ट्रॅक्टर! शेती कामासाठी आहे मजबूत पर्याय, वाचा किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solis 5024 S 4WD Tractor:- कृषी यांत्रिकीकरणांमध्ये ट्रॅक्टर या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण शेतीची पूर्व मशागती पासून तर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी  ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते

व एवढेच नाही तर आंतरमशागतीसाठी जे काही यंत्र विकसित करण्यात आलेली आहे त्यातील बहुसंख्य यंत्र हे ट्रॅक्टरचलित असल्याने आणखीनच ट्रॅक्टरचे महत्व वाढते. त्यामुळे शेती कामाच्या दृष्टिकोनातून कुठले ट्रॅक्टर शक्तिशाली किंवा मजबूत ठरेल या दृष्टिकोनातून शेतकरी ट्रॅक्टर खरेदीसाठी निवड करत असतात.

बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या उपलब्ध आहेत व त्यामुळे बऱ्याचदा ट्रॅक्टरची निवड करताना शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो.

त्यामुळे आपण या लेखामध्ये सोलीस या कंपनीकडून भारतामध्ये जे काही ट्रॅक्टर सादर करण्यात आलेले आहेत त्यामधील सोलीस 5024 S या चार व्हील ड्राइव्ह ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत जे शेतीसाठी कमीत कमी इंधनामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करू शकते.

 सोलीस 5024 एस 4WD ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 3065 सीसी क्षमतेसह तीन सिलेंडरमध्ये जपानी तंत्रज्ञान E3 इंजिन पाहायला मिळेल जे 50 एचपी पावर आणि 210 एनएम टॉर्क जनरेट करते. हा ट्रॅक्टर ड्राय टाइप एअर फिल्टरसह येतो.

या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 43 एचपी आहे व त्याचे इंजिन 2000 आरपीएम जनरेट करते. हा ट्रॅक्टर 55 लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह येतो व याचे हायड्रोलिक पावर ही दोन हजार किलोग्राम इतकी आहे.या ट्रॅक्टरचे वजन पाहिले तर ते 2520 किलोग्राम आहे.

तसेच सोलीस कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली असून हा ट्रॅक्टर 12 फॉरवर्ड+ बारा रिव्हर्स गिअर सह गिअरबॉक्ससह येतो. या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल क्लच देण्यात आले असून या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 34.52 किलोमीटर प्रतितास ठेवण्यात आलेला आहे.

तसेच या ट्रॅक्टरमध्ये मल्टी डीस्क आउटबोर्ड ओआयबी ब्रेक्स देण्यात आलेले आहे. ज्यामुळे सरकत्या म्हणजेच निसरड्या भागावर देखील टायर्स चांगली पकड ठेवू शकतात.

तसेच या ट्रॅक्टरमध्ये आयपीटीओ+ रिव्हर्स पीटीओ प्रकारचा पावर टेकऑफ देण्यात आलेला आहे व तो 540 आरपीएम जनरेट करतो. विशेष म्हणजे हे ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये येते.

 किती आहे सोलीस 5024 S 4WD ट्रॅक्टरची किंमत?

 भारतामध्ये या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत आठ लाख 80 हजार ते नऊ लाख तीस हजार रुपये इतकी आहे. तसेच ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि राज्यांमध्ये लागू होणाऱ्या रोड टॅक्समुळे बदलण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी या ट्रॅक्टरसह पाच वर्षाची वारंटी देते.