Tata Ace EV: लहान ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी महत्त्वाची आहे Tata Ace EV! एका चार्जमध्ये देते 154 किमीची रेंज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Ace EV:- देशामध्ये अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने तयार केली जात असून यामध्ये विविध प्रकारच्या दुचाकी तसेच कारचा समावेश आपल्याला करता येईल. तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर भारतातील आघाडीची  व्यावसायिक वाहन उत्पादक असलेली कंपनी म्हणजे टाटा मोटर्स होय.

या टाटा मोटर्सने मे 2022 मध्ये  नवीन Ace Ev वापरकर्त्यांसाठी विकसित केली होती. हे वाहन कार्गो मोबिलिटीसाठी सर्वांगीण सोल्युशन आणि पाच वर्षाची मेंटेनन्स पॅकेजसह येते.

तसेच या इलेक्ट्रिक वाहनाच्या कामगिरीला देखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.या Tata Ace Ev ची माहिती आपण या लेखात बघू.

 लहान ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी बेस्ट आहे टाटाची Ace Ev

 टाटा ने हे इलेक्ट्रिक वाहन अनेक वैशिष्ट्यांसह विकसित केले असून हे टाटा मोटर्सचे EVOGEN पहिले उत्पादन आहे. 154 किमी ची प्रमाणित रेंज देते. यामध्ये नवीन मॉडेल ऍडव्हान्स बॅटरी कूलिंग सिस्टम आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम सह सुरक्षित आणि प्रत्येक वातावरणात हे वाहन चालणार असल्याचा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे.

हाय अप टाईमसाठी वाहन रेगुलर आणि फास्ट चार्जिंग या दोन्ही सपोर्ट सिस्टम्ससह येते.यामध्ये 27kW( 36 बीएचपी) मोटर देण्यात आलेली आहे. जी 130 nm चा पिक टॉर्क जनरेट करते. तसेच टाटाच्या या ईव्ही मध्ये 208 क्युबिक फूट किंवा 3332.10 kg/ क्युबिक मीटर कार्गो व्हॅल्यू आणि 22 टक्के ग्रेड क्षमता असल्याचा दावा देखील कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

तसेच या कमर्शिअल वाहनाचा बॉडीचा प्रकार कंटेनर टाईप असून यामध्ये लिथियम आयओएन आयर्न फॉस्फेट प्रकारची बॅटरी वापरण्यात आलेली आहे व तिची क्षमता 21.3 kWh इतकी आहे. जर आपण याची जास्तीत जास्त पावर क्षमता पाहिली तर ती 27 kW इतकी आहे

व मॅक्स ग्रॅडेबिलिटी 22 टक्के आहे. हे इलेक्ट्रिक वाहन जास्तीत जास्त 130 एनएमचा टॉर्क जनरेट करते. या ईव्हीमध्ये सिंगल स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेला असून क्लच हा फ्री रियर व्हील ड्राईव्ह प्रकाराचा आहे.

तसेच यामध्ये मेकॅनिकल आणि व्हेरिएबल रेशॉ प्रकारची स्टेरिंग देण्यात आलेली आहे व या ईव्हीचा मॅक्झिमम स्पीड हा 60 किमी प्रति तास इतका आहे. यामध्ये ड्युअल सर्किट हायड्रोलिक ब्रेक्स फ्रंट-डिस्क, रियर ड्रम प्रकारचे ब्रेक्स देण्यात आलेले आहेत.

या वाहनाची लांबी 3800 एमएम  तर रुंदी  पंधराशे एमएम इतकी आहे. उंची पहिली तर ती 3635 mm इतकी आहे व व्हिलबेस हा 2100 एमएम इतका आहे.

ग्राउंड क्लिअरन्स हा 160 mm इतका आहे. तसेच hv बॅटरीची वारंटी सात वर्ष/ एक लाख 75 हजार किलोमीटर( जे लवकर असेल ते) आणि वाहनाची वारंटी पाच वर्ष/ एक लाख पन्नास हजार किलोमीटर( जे लवकर असेल ते) इतकी देण्यात आलेली आहे.