‘या’ आहेत 90 हजारापेक्षा कमी किमतीच्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ! तुमच्यासाठी कोणती Scooter बेस्ट राहणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top Electric Scooter : या चालू वर्षात देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. इलेक्ट्रिक कार, स्कूटर आणि बाईक यांचे मार्केट 2023 मध्ये मोठे फुलले आहे. आता अनेकांना इलेक्ट्रिक वाहनांची भुरळ पडली आहे. अनेकजन आता इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान जर तुम्हीही नवीन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण देशातील एक लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती जाणून घेणार आहोत.

विशेष म्हणजे आज आपण ज्या इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती पाहणार आहोत त्यापैकी काही इलेक्ट्रिक स्कूटर 151 किलोमीटर पर्यंतची रेंज देण्यास सक्षम राहणार आहेत. याशिवाय या स्कूटरचा टॉप स्पीड देखील खूपच चांगला राहणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

ओला S1X : ओला ही देशातील एक प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी आहे. या कंपनीने तयार केलेली S1X इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात खूपच फेमस झाली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची देशात सर्वत्र मोठी मागणी आहे.

ola s1x
ola s1x

मीडिया रिपोर्ट नुसार ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 91 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. या स्कूटरचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति अवर एवढा आहे. तसेच या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 90 हजार रुपये एवढी आहे. म्हणजेच ऑन रोड प्राईस ही यापेक्षा अधिक राहणार आहे.

ivoomi S1 : आयवूमी या कंपनीने लॉन्च केलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर ओला कंपनीच्या स्कूटरसोबत स्पर्धा करते. ही स्कूटर देखील देशातील एक प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. या गाडीचा टॉप स्पीड ५५ के एम पी एच एवढा असून ही गाडी एकदा चार्ज केली की 105 किलोमीटर पर्यंत धावत असल्याचा दावा केला जात आहे.

ivoomi S1
ivoomi S1

या गाडीची एक्स शोरूम किंमत ही फक्त 85 हजार रुपये एवढी आहे. म्हणजेच इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत या गाडीची किंमत निश्चितच कमी आहे.

सिंपल डॉट वन : सिम्पल एनर्जी या कंपनीने तयार केलेली सिम्पल डॉट वन ही इलेक्ट्रिक स्कूटर नुकतीच लॉन्च झाली आहे. या चालू महिन्यात अर्थात डिसेंबर 2023 मध्ये स्कूटर बाजारात लॉन्च झाली असून सध्या या स्कूटरची प्री बुकिंग सुरू आहे. या गाडीचा टॉप स्पीड हा 105 के एम पी एच एवढा आहे. विशेष म्हणजे ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 151 किलोमीटर पर्यंत चालते.

Simple dot one
Simple dot one

जेमोपाई रायडर सुपरमॅक्स : जेमोपाई कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर 60 के एम पी एच एवढा टॉप स्पीड देते. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर पर्यंत चालवली जाऊ शकते. अर्थातच या गाडीची रेंज 100 किलोमीटरची आहे. या गाडीची किंमत 80 हजार एवढी आहे. ही स्कूटरची एक्स शोरूम किंमत आहे.

Gemopi Rider Supermax
Gemopi Rider Supermax

Pure EV e-Pluto 7G : ही नव्याने बाजारात दाखल झालेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही गाडी 90 ते 120 किलोमीटर पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीचा टॉप स्पीड देखील चांगला आहे. ही गाडी 60 केएमपीएचचा टॉप स्पीड देण्यास सक्षम आहे.

Pure EV e-Pluto 7G
Pure EV e-Pluto 7G