तुम्हीही बाईकप्रेमी आहात का? ‘या’ आहेत बजेट फ्रेंडली दमदार परफॉर्मन्स असलेल्या अप्रतिम बाईक! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
honda cb300 r bike

बाईक म्हटले म्हणजे आजकालच्या तरुणाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते. अनेक स्पोर्टी, डॅशिंग आणि दमदार परफॉर्मन्स असलेल्या बाईक खरेदी कडे आजकालच्या तरुणाईचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जे तरुण बाईक प्रेमी असतात ते कितीही महाग बाईक असली तर तिला खरेदी करतात.

सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक स्पोर्टी आणि डॅशिंग लूक असलेल्या बाईक उपलब्ध असून काही बाईक त्यात बजेट फ्रेंडली आहेत. त्यामुळे तुम्ही देखील बाईकप्रेमी असाल व तुमच्या बजेट मधील बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या लेखात आपण अशा काही बाईकची माहिती घेणार आहोत ज्या तुम्हाला तीन लाख रुपयापेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या व दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या आहेत.

 या आहेत तीन लाख रुपये किमतीपर्यंतच्या अप्रतिम अशा बाईक

1- टीव्हीएस अपाची RTR 310- टीव्हीएस आपाची आरटीआर ३१० ही एक शक्तिशाली बाईक असून तिच्यामध्ये 312 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 35.6 एचपी पावर जनरेट करते व ही एक जबरदस्त परफॉर्मन्स असलेली बाईक आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत दोन लाख 43 हजार रुपये इतकी आहे.

2- होंडा सीबी 300R- ही बाईक कमी दर्जाची बाईक म्हणून आतापर्यंत ओळखली जात होती.परंतु आता ही बाईक दोन लाख 40 हजार रुपयांच्या अपडेटेड किमतीसह बाजारात आली असून ती तिच्या इतर स्पर्धेत असलेल्या बाईकच्या तुलनेमध्ये सध्या सरस आहे. या बाईकचे वजन 146 किलो असून ती 212.33 एचपी/ टन पॉवर टू वेट रेशो सह येते.

3- केटीएम 390 एडवेंचर X- या बाईकमध्ये 373 सीसी क्षमतेचे इंजिन असून जे 43.5 एचपी पावर आणि 37 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनिक रायडर सहाय्य मिळत नाही व याशिवाय यामध्ये एक साधा एलसीडी डिस्प्ले देखील आहे. जर तुम्हाला तीन लाख रुपयापेक्षा कमी बजेटमध्ये शक्तिशाली बाईक हवी असेल तर ही बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. या बाईकची एक्स शोरूम किंमत दोन लाख 80 हजार रुपये आहे.

4- ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400- ही बाईक बजाज आणि ट्रायम्फ यांच्या संयुक्त उत्पादन असून जिचा स्पीड 400 पेक्षा लांब असून ती मोठा आणि ऑफरोडींग करण्यासाठी सक्षम आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत दोन लाख 63 हजार रुपये असून ती स्क्रॅंबलर 400 एक्स पेक्षा सुमारे 30 हजार रुपयांनी महाग आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe