Car Care Tips: उन्हाळ्यामध्ये कार थंडी ठेवायची असेल तर ‘या’ उपकरणांची मदत घ्या! कार राहील थंडी व प्रवास होईल सुखद

Ajay Patil
Published:
car care tips

Car Care Tips:- सध्या सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णतेचा कहर झाला असून संपूर्ण भारतामध्ये उष्णतेची लाट सध्या सुरू आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून दिल्ली तसेच पंजाब, हरियाणा व राजस्थान सारख्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून बिहार व उत्तर प्रदेश मध्ये ऑरेंज अलर्ट आहे.

धोकादायक म्हणजे भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या तापमान 47°c वर पोहोचले आहे. त्यामुळे साहजिकच या सगळ्या प्रचंड असलेल्या तापमानाचा विपरीत परिणाम हा कार सारख्या वाहनांवर देखील होताना आपल्याला दिसून येत असून जर या परिस्थितीमध्ये जर कार प्रकाशामध्ये किंवा उष्णतेत पार्क केली तर तिचे तापमान 70° पर्यंत पोहोचते.

त्यामुळे अशा तप्त झालेल्या कारमधून प्रवास करणे खूप कठीण व आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा काही गॅजेट्स  म्हणजेच उपकरणे बघणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण कार थंड ठेवू शकतो.

 या उपकरणाची मदत घ्या कार थंडी ठेवा

1- सनशेड उन्हाळ्यामध्ये कारच्या खिडक्या आणि विंडोशिल्डवर सनशेड बसवणे खूप गरजेचे आहे. बरेच जण खिडक्यांकरिता सन शेड्स खरेदी करण्याला प्राधान्य देतात.परंतु विंड शिल्डकडे लक्ष देत नाहीत. परंतु कारमध्ये मुख्य भाग फक्त विंड शिल्डचा आहे. जेव्हा आपण कार पार्क करतो तेव्हा हे बसवलेले सनशेड कारच्या आतमध्ये सूर्यप्रकाश येण्यापासून रोखतात व कार गरम होत नाही.

2- सोलर पावर फॅन हा सौर उर्जेवर चालणारा पंखा असून तुम्ही कारमध्ये कोणत्याही खिडकीवर किंवा विंड शिल्ल्डवर याला बसवू शकतात. कार आपण पार्क करतो तेव्हा तापमान वाढू नये व उष्णता बाहेर राहावी याकरिता हे डिवाइस खूप महत्त्वाचे आहे. सोलर पावर फॅन तुम्ही ऑनलाईन किंवा कोणत्याही कार ॲक्सेसरीजच्या शॉपमधून खरेदी करू शकतात.

3- वॉटर कूलिंग कुशन कव्हर बऱ्याचदा आपल्याला अनुभव असेल की जेव्हा आपण कार पार्क केलेली असते व परत आपण कारमध्ये येतो तेव्हा सीट खूप गरम झालेले असतात. ही समस्या टाळण्याकरता तुम्हाला वाटर कुलिंग कुशन कव्हर्स बसवणे खूप गरजेचे आहे

व हे कुशन तुम्हाला बाजारात सहजरीत्या उपलब्ध होतात. तसेच ऑनलाईन साईटच्या माध्यमातून तुम्ही दीड ते दोन हजार रुपयांमध्ये हे विकत घेऊ शकतात. सिटसाठी यांचा वापर केल्यामुळे सिट कमी गरम होतात.

4- कार अम्ब्रेला ही छत्री वाहनाच्या वरती ठेवलेली असते व त्यामुळे गाडी सावलीत उभी राहते आणि गरम होत नाही. भारतामध्ये अशा प्रकारे अम्ब्रेला वापरणे व्यावहारिक दृष्टिकोनातून नुकसानकारक ठरू शकते. कारण सार्वजनिक ठिकाणी या प्रकारच्या छत्रीचे नुकसान लोकांकडून होऊ शकते. जेव्हा एखाद्या सुरक्षित पार्किंगच्या ठिकाणी वाहन उभे केले जाते तेव्हा कार अम्ब्रेला वापरता येणे शक्य आहे.

5- कार्टन सीट्स कव्हर कार मधील सीटवर तुम्ही हे सीट कवर बसवू शकतात व हे स्वस्त असतात. कर्जत थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात जरी आली तरी देखील हे इतर सीट सारखे गरम होत नाहीत.  जर कारमध्ये साईड एअर बॅग दिल्या असतील तर या प्रकारचे सीट कव्हर टाळणे हा एक चांगला पर्याय आहे. अशावेळी तुम्ही टॉवेलचा वापर करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe