Cheapest Bike In india:- भारतामध्ये अनेक बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतींमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्य असलेल्या बाईक बाजारपेठेत लॉन्च केले जातात. तसेच कोणत्याही व्यक्तीला जर बाईक खरेदी करायचे असेल तर तो सगळ्यात अगोदर बाईकची किंमत,
तिचे वैशिष्ट्य आणि मायलेज इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो. कमीत कमी किमतीमध्ये चांगले आणि दमदार इंजिनसह पावरफुल बाईक मिळाली तर खूप चांगले होते.
भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक स्टायलिश डिझाईन असलेल्या कमी बजेटमध्ये मिळू शकतील अशा बाईक उपलब्ध आहेत व त्यांचे मायलेज देखील उत्तम आहे. त्यामुळे अशा कोणत्या बाईक आहेत की त्या कमी किमतीत चांगले वैशिष्ट्य आणि मायलेज देतात अशा बाईक ची माहिती या लेखात घेऊ.
या आहेत भारतातील कमी किमतीत मिळणाऱ्या बाईक
1- बजाज CT110X- बजाजची ही बाईक ग्राहकांमध्ये लोकप्रिय असून तिच्या बोल्ड लुकमुळे ती खूप पसंतीस उतरली आहे. या बाईकमध्ये 115.45cc क्षमतेचे इंजिन असून ते 8.6 पीएस पावर आणि 9.81 एनएम टॉर्क जनरेट करते.
तसेच हे इंजिन चार स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज असून ही बाईक किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टने सुसज्ज आहे. या बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रति तास असून एका लिटरमध्ये 70 ते 72 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देऊ शकते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 67 हजार 322 रुपये आहे.
2- हिरो एचएफ 100- ही हिरो मोटोकॉर्प कंपनीची बाईक असून अत्यंत परवडणाऱ्या किमतीत मिळणारी व टिकाऊ अशी बाईक आहे. ही बाईक 83 kmpl इतके मायलेज देऊ शकते. या बाईकमध्ये कंपनीने 97.2 सीसी क्षमतेचे इंजिन दिले असून ते 8.36 पीएस पावर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते.
इंजिन चार स्पीड गिअरबॉक्स ने सुसज्ज आहे. एवढेच नाही तर या बाईकच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आलेला आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 54 हजार 962 रुपयांपासून सुरू होते.
3- टीव्हीएस स्पोर्ट्स– ही बाईक स्पोर्ट डिझाईनमध्ये येते व यामध्ये 110 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून ते ८.२९ पीएस पावर आणि 8.7nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन चार स्पीड गिअर बॉक्सने सुसज्ज आहे.
जर आपण एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनुसार बघितले तर या बाईकने मायलेजच्या बाबतीत एक नवीन रेकॉर्ड बनवले असून त्यानुसार ही एका लिटरमध्ये 110.12 kmpl इतके मायलेज देते. या बाईकची किंमत 61,500 पासून सुरू होते.