Top Selling Tractor: सणासुदीला घ्यायचे असेल ट्रॅक्टर तर ‘हे’ आहेत भारतातील टॉप 10 ट्रॅक्टर! शेतीसाठी आहेत उत्तम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top Selling Tractor:- कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाने खूप मोठी क्रांती घडवून आणली असून या यंत्रामध्ये ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे असे यंत्र आहे. शेतीमध्ये सर्वात जास्त कुठले यंत्र वापरले जात असेल तर ते ट्रॅक्टर हे होय. शेतीची पूर्व मशागती पासून तर आंतरमशागत व पीक काढणीपर्यंतची अनेक कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून पार पाडले जातात.

शेतीतील इतर कामांसाठी काही यंत्रे विकसित करण्यात आली असून ती ट्रॅक्टरचलीत असल्याने ट्रॅक्टरचा वापर त्यांच्यासाठी देखील केला जातो. या अनुषंगाने बाजारपेठेमध्ये ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतु त्यामधील काही मोजक्याच ट्रॅक्टरला शेतकऱ्यांकडून पसंती दिली जाते. या अनुषंगाने आपण या लेखात भारतातील जे काही दहा टॉप विक्री होणाऱ्या ट्रॅक्टर कंपनी आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत.

 भारतातील दहा टॉप ट्रॅक्टर सेलिंग कंपन्या

जर आपण शेतकऱ्यांच्या पसंतीची महत्त्वाची ट्रॅक्टरची नावे पाहिली तर ती महिंद्रा अँड महिंद्रा, स्वराज तसेच टाफे, एस्कॉर्टस, इंटरनॅशनल ट्रॅक्टर तसेच फोर्स, कुबोटा यासारख्या कंपन्यांच्या ट्रॅक्टरचा समावेश यामध्ये करता येईल. यामध्ये आपण महिंद्रा ट्रॅक्टरचा विचार केला तर ते सर्वाधिक विकले जाणारे ट्रॅक्टर असून सप्टेंबर महिन्यातील जर आपण महिंद्रा अँड महिंद्राचा विक्री अहवाल पाहिला तर गेल्या महिन्यात 12,600 ट्रॅक्टरची विक्री झाली.

या आकडेवारीवरून आपल्याला महिंद्रा सर्वाधिक विकले जाणारे ट्रॅक्टर आहे याबद्दलचा अंदाज येतो. यासोबतच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा स्वराज हा विभाग असून या विभागाच्या माध्यमातून देखील 9853 ट्रॅक्टरची विक्री केली गेली आहे. यामध्ये तिसरा क्रमांक हा इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेड या कंपनीचा असून या कंपनीने 7065 ट्रॅक्टरची विक्री केली. यामध्ये चौथ्या क्रमांकावर टाफे लिमिटेड ही ट्रॅक्टर कंपनी असून या ट्रॅक्टर कंपनीने गेल्या महिन्यात 6862 ट्रॅक्टर विकले आहेत. पाचव्या क्रमांकावर एस्कॉर्टस लिमिटेड ही कंपनी असून या कंपनीने सप्टेंबरमध्ये 5826 ट्रॅक्टरची विक्री केली आहे.

 याशिवाय इतर महत्त्वाचे ट्रॅक्टर

यानंतर सहाव्या क्रमांकावर जॉन डियर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नंबर लागतो. या कंपनीने गेल्या महिन्यांमध्ये 3792 ट्रॅक्टरची विक्री केली होती व त्यापाठोपाठ आयशर ट्रॅक्टरने 3745 ट्रॅक्टर विकले होते. या दहा टॉप मॉडेल्समध्ये 8 वा क्रमांक वर सीएनएच इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी होती व या कंपनीने 1903 ट्रॅक्टरचे युनिट विकले.

त्यानंतर कुबोटा एग्रीकल्चर मशीनरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने 918 ट्रॅक्टर विकले आणि व्हीएसटी टायलर ट्रॅक्टर लिमिटेड ने 279 ट्रॅक्टरची विक्री केली. अशा पद्धतीने हे दहा भारतातील टॉप ट्रॅक्टर असून शेतकऱ्यांमध्ये यांना जास्त पसंती दिसून येते. हा सगळा अहवाला फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन कडून तयार केला जातो.