सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कार, दुचाकी आणि स्कूटर्स उत्पादित केल्या जात असून त्याच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर आणि वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे हळूहळू वाढताना दिसून येत आहे.
त्यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत असून यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचे निर्मिती करणाऱ्या कंपन्या देखील मागे नाहीत.
यामध्ये देखील अनेक कंपन्या ग्राहकांच्या मागणीनुसार खास अपडेटेड फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करत आहेत. याच प्रकारे आता दुचाकी निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या टीव्हीएस या कंपनीने अपडेटेड फिचर्स असलेली नवीन स्वस्त अशी स्कूटर भारतात लॉन्च केली आहे.
टीव्हीएसने लॉन्च केली iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन बेस व्हेरीयंट
टीव्हीएस या अग्रगण्य कंपनीने खास फीचर्स असलेली नवीन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर iQube चे नवीन बेस व्हेरिएंट लॉन्च केले असून नवीन बेस व्हेरियंट 2.2 kWh बॅटरी पॅक सह बाजारात आणले गेले असून याशिवाय टीव्हीएस कंपनीने iQube च्या टॉप स्पेस एसटी प्रकाराची डिलिव्हरी देखील सध्या सुरू केली आहे.
यातील एसटी प्रकार 3.4 kWh आणि 5.1 kWh अशा दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. iQube सिरीज एकूण तीन बॅटरी पॅक पर्यायांसोबत पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या नवीन बेस वेरियंटमध्ये 4.4 kW हब माउंटेन बीएलडीसी मोटर असून जी 140 एनएम टॉर्क जनरेट करते व ही मोटर 2.2 kWh बॅटरी च्या माध्यमातून पावर घेते.
बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही इको मोडमध्ये असेल तर 75 किमी व पावर मोडमध्ये असेल तर 60 km ची रेंज देते. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी जर तुम्ही फास्ट चार्जरचा वापर केला तर ती दोन तासांमध्ये शून्य ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. हा प्रकार वालनट ब्राऊन आणि पर्ल व्हाईट या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
या नवीन बेस व्हेरियंटमध्ये पाच इंचाचा रंगीत टीएफटी स्क्रीन तसेच 950W चा चार्जर, क्रॅश अलर्ट, टो अलर्ट, टर्न बाय टर्न नेवीगेशन आणि 30 लिटर खाली आसन स्टोरेज देण्यात आली आहे.
iQube ST येते दोन बॅटरी पॅक पर्यायांसह
यामध्ये iQube एसटी ही दोन बॅटरी पॅक पर्यंत येते व हे पर्याय म्हणजे 3.4kWh आणि 5.1kWh हे होय. यातील 3.4kWh प्रकार हा सिंगल चार्जवर 100 किमीची रेंज आणि 78 kmph टॉप स्पीड देते व 5.1kWh पर्याय हा सिंगल चार्जवर 150 km ची रेंज आणि ८२ किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देते. यातील 3.4kWh ची एक्स शोरूम किंमत एक लाख 55 हजार रुपये तर 5.1kWh व्हेरिएंटाची एक्स शोरूम, बेंगलोर किंमत ही एक लाख 45 हजार रुपये आहे.
टीव्हीएस iQube च्या नवीन बेस व्हेरियंटची किंमत
यामध्ये आयक्यूबच्या नवीन बेस एरियंटची एक्स शोरूम किंमत 94 हजार 999 रुपये ठेवण्यात आलेली आहे. ही किंमत त्याच्या इतर व्हेरियंटपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे यामध्ये इएमपीएस सबसिडी आणि कॅशबॅक देखील समाविष्ट आहे व ही प्रास्ताविक किंमत 30 जून 2024 पर्यंत वैध असणार आहे.