Under 7 Lakh CNG Cars : 7 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये येतात या 4 सुपरहिट CNG कार, देतात 35 Kmpl मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Under 7 Lakh CNG Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या शानदार CNG कार सादर केल्या आहेत. त्यांच्या CNG कारला ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीचा CNG सेगमेंट मजबूत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तुमचेही बजेट CNG कार खरेदीसाठी 7 लाख रुपये असेल तर काळजी करू नका. 7 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये मारुती आणि टाटा मोटर्सच्या CNG कार उपलब्ध आहे. या कार दमदार मायलेज देण्यास सक्षम आहेत.

टाटा टियागो

टाटा मोटर्सकडून त्यांची Tiago CNG कार अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. Tiago कारच्या XI व्हेरियंटमध्ये CNG पर्याय देण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.60 लाख रुपये आहे. Tiago CNG कार 26.49 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर

मारुती सुझुकीकडून दमदार मायलेज देणाऱ्या CNG कार भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. वॅगनआर CNG कार कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे.

1 किलो CNG मध्ये वॅगनआर कार 34.05 Kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे. WagonR LXI CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख आहे तर VXI CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.89 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकीकडून त्यांच्या S-Presso कारच्या LXI आणि VXI या दोन व्हेरियंटमध्ये CNG पर्याय देण्यात आला आहे. S-Presso LXI CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे तर VXI CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.12 लाख रुपये आहे. ही कार 32.73 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी Eeco

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून Eeco फॅमिली कारमध्ये देखील CNG पर्याय देण्यात आला आहे. Eeco कारच्या CNG व्हेरियंटची एक्स शोरूमम किंमत 6.58 लाख रुपये आहे. ही CNG कार 26.78 Kmpl मायलेज देते.