White Cars : पांढऱ्या रंगाच्या कार सर्वाधिक का विकल्या जातात? जाणून घ्या यामागील रंजक कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

White Cars : तुम्ही अनेकदा बाजारात किंवा रस्त्यावर पाहिले असेल की सर्वाधिक पांढऱ्या रंगाच्या कार दिसतात. अनेकजण नवीन कार खरेदी करण्यासाठी गेल्यावर सर्वात प्रथम पांढऱ्या रंगाच्या कारलाच प्राधान्य देत असतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का अनेकजण पांढऱ्या रंगाची कारच का हरेदी करतात?

भारतातच नाही तर जगामध्ये ३९ टक्के पांढऱ्या रंगाच्या कार वापरल्या जात आहेत. पांढऱ्या रंगाच्या कारमागे अनेक कारणे आहेत. तुम्हीही नवीन कार खरेदी करणार असाल तर पांढऱ्या रंगाची कार का खरेदी करावी हे देखील पाहणे आवश्यक आहे.

लोक पांढऱ्या रंगाच्या कार का निवडतात

BASF जगातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या कार उत्पादकाला पेंट पुरवते. त्यांच्या अहवालानुसार जगामध्ये 39 टक्के कार पांढर्‍या रंगाच्या आहेत. त्यानंतर, 18 टक्के कार काळ्या आहेत, 16 टक्के कार ग्रे, 8 टक्के सिल्व्हर आणि 8 टक्के निळ्या आहेत.

भारतात देखील सर्वाधिक पांढऱ्या रंगाच्या कार वापरल्या जातात. तसेच सध्या पांढऱ्या रंगाच्या कारची क्रेझ देखील अधिक आहे. तसेच या पांढऱ्या रंगाच्या कारची अधिक पैसे देखील लागत नाहीत. त्यामुळे या रंगाच्या कार स्वस्त देखील आहेत.

स्वस्त

इतर रंगाच्या तुलनेत पांढऱ्या रंगाची कार स्वस्त देखील आहे. त्यामुळे लोकांच्या पैशांची बचत होत आहे. तसेच कंपन्यांकडून पांढऱ्या रंगाच्या कारचे उत्पादन देखील सर्वाधिक केले जाते. त्यामुळे लोकांना पांढऱ्या रंगाच्या कारसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागत नाही.

देखभाल

भारतात अनेक राज्यांमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था आहे. तसेच रस्त्यावरील धूळ गाडीवर साचते. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या कारवर अशा प्रकारची धूळ दिसत नाही. तसेच पांढऱ्या रंगाच्या कारची देखभाल करणे देखील सोपे असते. पांढऱ्या रंगाच्या कारवर ओरखडे दिसत नाहीत.

पांढऱ्या रंगाच्या कारला हवामानाचे फायदे

अनेकदा अनेकजण काळ्या किंवा इतर रंगाच्या कार खरेदी करतात. मात्र काळा रंग जास्त उष्णता शोषक आहे त्यामुळे सतत कारमधील एसी चालू ठेवावा लागतो. तसे पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो त्यामुळे कारमध्ये जास्त एसीची गरज पडत नाही.

कोणत्या रंगाच्या कार सर्वाधिक विकल्या जातात त्याची टक्केवारी

– पांढरा: 39 टक्के
– काळा: 18 टक्के
राखाडी: 16 टक्के
– सिल्व्हर : 8 टक्के
– निळा: 8 टक्के
– लाल: 5 टक्के
– हिरवा: 1 टक्के
– तपकिरी: 1 टक्के
– ऑरेंज : 1 टक्के
– पिवळा: 1 टक्के
– व्हायलेट: 1 टक्के