यामाहाने लॉन्च केली स्टायलिश लुक आणि पावरफुल इंजिन असलेली Yamaha FZ S Fi बाईक! वाचा या बाईकची किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतामध्ये जेवढ्या बाईक उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्या यादीमध्ये यामाहाचे नाव देखील गेल्या कित्येक वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आपल्याला दिसून येते. यामाहाची RX 100 ची क्रेझ आपल्याला आज देखील ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

या कंपनीच्या बाईक नेहमीच स्टायलिश लुक आणि पावरफुल इंजिनसाठी ओळखल्या जातात व अशीच एक पावरफुल इंजिन व स्टायलिश लुक असलेली बाईक यामाहाने दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केली आहे. सध्या ही बाईक मॅट ग्रे, मेट रेड आणि डार्क नाईट या रंगांमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही 149cc इंजिन क्षमता असलेली बाईक आहे.

 काय आहेत यामाहा FZ S Fi बाईकची वैशिष्ट्ये?

या बाईकचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पीड गिअरबॉक्ससह येते व यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आलेले आहे. या बाईकच्या बाबतीत यामाहा कंपनीने दावा केला आहे की, रस्त्यावर ही बाईक 45 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देईल व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बाईकला तेरा लिटर क्षमतेची मोठी आकाराची इंधन टाकी देखील देण्यात आलेली आहे.

तसेच रायडरची सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता यामध्ये पुढील आणि मागील टायरवर डिस्क ब्रेक देण्यात आलेले असून यामध्ये स्टायलिश अलॉय व्हिल देखील देण्यात आलेले आहे. या बाईकमध्ये दोन प्रकार उपलब्ध असून ही बाईक रस्त्यावर 115 किलोमीटर प्रतितास इतका टॉप स्पीड देते.

यामाहाच्या या बाईकचे सीट पाहिले तर त्याची उंची 790 मिमी असून पावरच्या बाबतीत ही 7250rpm वर 12.2 बीएचपीची पावर जनरेट करते. तसेच यामध्ये कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे. तसेच या बाईक मध्ये एलईडी हेडलाईटस आणि टेडलाईट देण्यात आलेले असून या बाईकचे वजन 135 किलो इतके आहे.

 किती आहे Yamaha FZ S Fi बाईकची किंमत?

ही बाईक डार्क नाईट, मॅट रेड आणि मॅट ग्रे  या तीन रंगांमध्ये उपलब्ध असून किंमत पाहिली तर ती एक लाख 22 हजार रुपयांच्या एक्स शोरूमच्या प्रारंभिक किमतीत कंपनी ऑफर करत आहे.