शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीनने गाठला सात हजाराचा टप्पा ; अजून वाढणार भाव?

Agriculture Market : गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी दर मिळाला होता. साहजिकच यामुळे सोयाबीन लागवडीत आलेला क्षेत्रात वाढ होणार होती अन झालं देखील तसंच सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. यंदा देखील चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

परंतु या हंगामात तस काही झालं नाही. याउलट चालू महिन्यात सोयाबीन दरात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच सोयाबीन उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता सीड क्वालिटीच्या म्हणजे बीजवाईसाठी वापरल्या जाणाऱ्या सोयाबीन दरात वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शनिवारी झालेल्या लिलावात या उच्च क्वालिटीच्या मालाला जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. पण मिल क्वालिटीचा माल अजूनही 6000 रुपयाच्या आतच विक्री होत आहे. शनिवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात सीड क्वालिटी सोयाबीनला 7000 चा दर मिळाला तर मेल क्वालिटी सोयाबीनला पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा पर्यंतचा दर मिळाला.

म्हणजेच आता भावात वाढ होत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोयाबीन दरात वाढ झाली आहे. चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होत असल्याने जागतिक बाजारात तेजी आली आहे. परंतु याचा देशांतर्गत फारसा फरक पाहायला मिळत नव्हता. शनिवारी मात्र बाजारपेठेचा मूड बदलला.

देशाअंतर्गत सोयाबीन दरात वाढ झाली. जागतिक बाजारात सोया पेंड आणि सोयाबीन तेल दरात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसात देशांतर्गत सोयाबीन दरात वाढ होऊ शकते असा अंदाज जाणकारांचा आहे. निश्चितच गेल्या तीन दिवसांपासून देशांतर्गत सोयाबीन दरात थोडीशी वाढ पाहायला मिळाली असल्याने जाणकारांच्या दाव्याला दुजोरा मिळत आहे.

यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीन उत्पादकांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काही सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते, उत्पादनात जी काही घट झाली होती ती भरून निघण्यास मदत होईल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.