अहमदनगर बाजारभाव : कांद्याची घसरगुंडी तर लिंबाची आगेकुच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar market price : यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच भाजीपाल्याची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला.

त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले, या नैसर्गिक संकटात फळबागांना देखील चांगलाच फटका बसला असून अनेक ठिकाणी फळ गळती झाली तर अनेक भागात कमी प्रमाणात बहार आल्याने उत्पादनात घट आली आहे.

त्यामुळे उन्हाळ्याची चाहमल लागताच लिंबाला चांगले दर मिळत आहेत. मात्र दुसरीकडे कांद्याने मात्र पर शेतकऱ्यांची निराशाच केली आहे. निर्यात बंदी मागे घेतल्याच्या चर्चेमुळे रातोरात २५०० रूपयांवर गेलेला कांदा परत १२०० ते १५०० रूपयांवर आला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण बाजारात येण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे बाजारात लसणाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने लसणाचे दर चांगलेच वाढलेले आहेत.

त्यापाठोपाठ गवारीच्या शेंगाला २०० रूपये किलोने विकल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या हातात मात्र अत्यंत कमी पैसे मिळत आहेत. त्यामुळे दर वाढून देखील शेतकरी उपाशीच असल्याचे चित्र आहे

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर टोमॅटो ५०० – २०००, वांगी ४०० – २०००, फ्लावर ५००- ३०००, कोबी ६०० – १०००, काकडी ८००- २०००, गवार ७००० – १४०००, घोसाळे ३००० – ४०००, दोडका ३००० – ६०००, कारले ३००० – ४०००, भेंडी २००० – ४०००,

वाल १५०० – २५००, घेवडा २५००- ४५००, तोंडुळे २००० – २५००, डिंगरी २०००- २५००, बटाटे ८०० – १८००, लसूण ८००० २०,०००, हिरवी मिरची २५०० – ४०००, आवळा १५०० २२००, शेवगा १००० ३०००, लिंबू ३००० – ९०००,

आद्रक ५००० – ७५००, दु.भोपळा ६०० – ७५००, शिमला मिरची २००० ४०००, मेथी ४०० – ६००, कोथिंबीर ४००- ७००, पालक ५०० – १०००, मुळे १४०० – १४००, कांदा पात ६०० – ९००, वाटाणा ३०००-५०००.