Gold Rate: अर्थसंकल्पाच्या 2 तासात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण! सोने झाले तब्बल 3000 रुपयांनी स्वस्त, वाचा काही शहरातील अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचे भाव

Ajay Patil
Published:
gold rate

Gold Rate:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला व त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. देशातील पायाभूत सुविधांपासून शेतकरी तसेच विद्यार्थी व  रोजगाराच्या संबंधित या घोषणांमध्ये सोने चांदीचे बाबतीत देखील काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यामुळे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली

व याचा सरळ परिणाम जळगाव आणि पुण्याच्या सराफ बाजारांमध्ये दिसून आला. जर आपण जळगाव आणि पुण्याच्या सराफ बाजारांचा दृष्टिकोनातून बघितले तर दोन तासांमध्येच प्रति तोळा तीन हजार रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचे बोलले जात आहे.

 या कारणामुळे सोन्याच्या दरात कपात

आज अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला व ही घोषणा होतात दोनच तासांमध्ये राज्यातील जळगाव व पुणे येथील महत्त्वाच्या सराफा बाजारात त्याचे परिणाम दिसून आले.

अर्थसंकल्पाच्या अवघ्या दोन तासांमध्ये सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घट झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून ग्राहकांची देखील गर्दी वाढल्याचे यावेळी दिसून येत आहे.

जर आपण सोने आणि चांदीचे कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क पाहिले तर ते आधी 15% होते व ते आता पंधरा वरून सहा टक्के करण्यात आले. म्हणजेच निम्म्याने सीमा शुल्कामध्ये घट केल्यामुळे सोन्याच्या दरात ही घट झाली.

 राज्यातील काही प्रमुख शहरातील सोन्याचे दर

1- सोलापूर सोलापूरमध्ये सोन्याचे आधीचे दर 73 हजार पाचशे रुपये प्रति तोळा होते तर आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 71 हजार पाचशे रुपये झाले आहेत( अंदाजे) त्यासोबतच चांदी आधी 92 हजार रुपये प्रतिकिलो होती तर ती आता 91 हजार रुपये प्रति किलो वर आली आहे. ( अंदाजे)

2- बुलढाणा बुलढाण्यामध्ये काल 91 हजार 650 रुपये किलो चांदी होती तर आज 84 हजार 330 रुपये प्रतिकिलो आहे. सोबतच काल सोने 73 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम होते तर आज 68 हजार रुपये प्रति दहा ग्राम आहे.

3- वाशिम वाशिम येथे आधी 73 हजार पाचशे रुपये सोने होते व आता ते 70500 झाले. तर चांदी आधी 92 हजार रुपये होती तर ते आता 86 हजार रुपये झाली.

4- परभणी या ठिकाणी काल सोने 73 हजार दोनशे रुपये प्रति तोळा होते. तर आज 71 हजार रुपये प्रति तोळा आहे. चांदी काल 89 हजार पाचशे रुपये प्रति किलो होती तर आज 87 हजार पाचशे रुपये प्रति किलो आहे.

5- अमरावती या ठिकाणी आधी 73400 सोने होते व आता 71 हजार 300 रुपये आहे. तर चांदी आधी 91 हजार प्रतिकिलो होती तर आता 88 हजार रुपये प्रति किलो आहे.

6- नांदेड अर्थसंकल्पापूर्वी या ठिकाणी सोने 74,400 प्रति तोळा होते व अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 71 हजार आठशे रुपये प्रति तोळावर आले व चांदी बजेटच्या अगोदर 91,400 होती तर बजेट सादर झाल्यानंतर 88 हजार रुपये प्रति किलोवर आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News