Kapus Bajarbhav : खरं काय ! जर असं झालं तर कापूस बाजार भाव पार करतील 10 हजाराचा टप्पा, वाचा सविस्तर

Kapus Bajarbhav : गेल्या हंगामात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला होता. गेल्या वर्षी खुल्या बाजारात कापसाला चांगला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्री करण्याऐवजी खुल्या बाजारात कापूस विक्री करण्यास अधिक पसंती दर्शवली. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गतवर्षी संपूर्ण हंगामभर कापसाला हमीभावापेक्षा अधिक बाजार भाव मिळाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे शेतकऱ्यांना शासनाने सुरू केलेल्या केंद्रावर कापूस विक्री करण्याची गरज भासली नाही. एकंदरीत गेल्यावर्षी शासनाची खरेदी केंद्र विरान पडलेली होती. परिणामी यावर्षी भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून कापसाची खरेदी करण्याचा प्लॅन आखला. मात्र भारतीय कापूस महामंडळाने आखलेला हा प्लॅन केव्हा इम्प्लिमेंट केला जाईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

विजयादशमीपासून कापसाचा हंगाम सुरू झाला असला तरी देखील अजून भारतीय कापूस महामंडळाकडून कापसाची खरेदी करण्यासाठी एकही केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी आता शेतकरी बांधव सीसीआयला कापूस खरेदी करण्यासाठी मुहूर्त सापडते की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित करत आहेत. मित्रांनो एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार, यावर्षी भारतीय कापूस महामंडळ तब्बल 50 खरेदी केंद्राच्या माध्यमातून खुल्या बाजारातून कापूस खरेदी करणार आहे.

Advertisement

तिथेच यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून याचा कापूस बाजाराला आधार मिळणार आहे. मात्र भारतीय कापूस महामंडळाला कापूस खरेदी करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने शेतकरी बांधवांचा अडचणीत भर पडत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्या तीन दिवसांपासून कापसाच्या बाजार भावात सुधारणा होत आहे. मात्र जर भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदी सुरू केली तर कापसाच्या दरात अजूनच वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात आली आहे.

मित्रांनो, जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी कापसाचे बाजार भाव संपूर्ण भारत वर्षात आठ हजार रुपये प्रतिक्विंटल ते 9000 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान रेंगाळणार आहेत. दरम्यान या बाजारभावात शेतकरी बांधवांना कापूस विक्री करणे यावर्षी परवडणार नसल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. शेतकरी बांधवांच्या मते त्यांना यावर्षी कापूस उत्पादित करण्यासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागला आहे.

यावर्षी कापूस पिकावर अतिवृष्टीमुळे तसेच स्पर्धेच्या पावसामुळे विपरीत परिणाम झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे. यावर्षी हवामान बदलामुळे गुलाबी बोंड अळी देखील कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. अशा परिस्थितीत कापसाच्या उत्पादनात कधी नव्हे ती घट होणार आहे.

Advertisement

यामुळे शेतकरी बांधव कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान खुल्या बाजारात 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव येत्या काही दिवसात मिळणार असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले असल्याने यावर्षी भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्रात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री करू शकतात असे जाणकार लोकांनी नमूद केले आहे.

यामुळे निश्चितच भारतीय कापूस महामंडळाकडून केव्हा कापसाचे खरेदी सुरू केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी भारतीय कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी सुरू झाल्यास कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटर पर्यंत जाऊ शकतात असे देखील नमूद केले आहे.

मात्र कापसाचे बाजार भाव किती वाढतात हा तर येणारा काळच सांगणार आहे. मात्र सरासरी कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव या हंगामात मिळणार असल्याचे असे जवळपास सर्वच जाणकार लोक नमूद करत आहेत.

Advertisement