Kapus Bajarbhav : धक्कादायक ! कापसाच्या बाजारभावात वाढ होत असताना ‘या’ बाजारात कापसाच्या बाजारभावात झाली ‘इतकी’ घसरण ; वाढतील का दर, वाचा

Kapus Bajarbhav : काल कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली होती. काल राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात पाच टक्क्यांनी वाढ झाली असल्याने देशांतर्गत कापसाचे बाजार भाव तेजीत येऊ पाहत आहेत. मात्र अशातच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात काल घसरण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला चांगला बाजारभाव मिळाला असल्याने यावर्षी लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, यावर्षी मुहूर्ताचा काही काळ वगळता कापूस बाजार भाव दबावात पाहायला मिळत आहेत. गेल्यावर्षी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळाला होता. दरम्यान यावर्षी देखील कापूस खरेदीला सुरुवात झाल्यानंतर अकोट बाजारात कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला.

मात्र तदनंतर कापसाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली. सध्या अकोट एपीएमसी मध्ये साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत बाजार भाव मिळत आहे. म्हणजे खरेदीच्या सुरुवातीच्या तुलनेत कापसाच्या बाजारभावात पाचशे रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात कापसाच्या बाजारभावात वाढ होणार का हा मोठा प्रश्न कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या पुढ्यात उभा राहिला आहे.

Advertisement

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, यावर्षी जास्तीच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट होत आहे अशा परिस्थितीत कापसाला विक्रमी बाजारभाव मिळाला तरच कापूस उत्पादनात झालेली घट भरून काढता येणे शक्य होणार आहे. दरम्यान कापसाच्या बाजारभावात घट होत असली तरी देखील अकोटमध्ये इतर कृषी उत्पन्न बाजार समिती पेक्षा चांगला दर मिळत आहे. मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना कापसाच्या बाजार भावात अजून वाढ होण्याचे असे आहे.

यामुळे आगामी काळात कापसाला काय भाव मिळतो तसेच कापसाच्या बाजार भावात वाढ होते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजार भाव वाढत असल्याने आणि भारतात आयात होणाऱ्या कापसावर 11% शुल्क आकारले जात असल्याने कापुस बाजार भावात वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात कापसाचे बाजार भाव किती वाढतील याकडे शेतकऱ्यांसमवेतच जाणकार लोकांचे बारीक लक्ष आहे.

Advertisement