Maharashtra Soybean Bajarbhav : दिलासादायक ! सोयाबीन दरात पुन्हा झाली वाढ ; वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Soybean Bajarbhav : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सोयाबीन दर दबावात आहेत. काल जागतिक बाजारपेठेत बाजारभावात सुधारणा झाली असली तरी देखील देशांतर्गत बाजार भाव दबावात होते. आज मात्र माहोल बदलला आहे.

आज देशांतर्गत सोयाबीन दरात थोडीशी सुधारणा झाली आहे. आजच्या लिलावात अमरावती आणि पालम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी बाजारभावात वाढ झाली असून सरासरी बाजार भाव 5600 रुपये प्रति क्विंटल वर गेला आहे. खरं पाहता कालपर्यंत सोयाबीन बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रत्येक क्विंटलच्या आतच होते.

आज मात्र यामध्ये 100-200 रुपयाची सुधारणा झाली आहे. पण इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज देखील सोयाबीन बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत होते. परंतु अमरावती आणि पालमच्या बाजारात आज भाव वाढ झाली असल्याने आगामी काळात दर अजून वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमधील सोयाबीन बाजारभावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला 5500 प्रतिक्विंटल एवढा किमान आणि 5725 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल तसेच सरासरी बाजार भाव 5612 मिळाला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1263 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 5499 आणि सरासरी दर पाच हजार 425 एवढा नमूद झाला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 551 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5351 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर 5331 नमूद झाला आहे.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 28 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आणि सरासरी दर पाच हजार रुपये नमूद झाला आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज सात क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5351 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 5375 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3900 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5450 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 5567 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 5508 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 4500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या यूपीएमसी मध्ये सोयाबीनला 5,050 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5460 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5310 नमुना झाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 700 क्विंटल आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5513 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५४११ नमूद झाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 57 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4700 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5300 रुपये नमूद झाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 277 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5499 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5350 नमूद झाला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज 6886 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5650 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5350 नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 4298 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावा द्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार 95 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5595 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5350 नमूद झाला आहे.

पालम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 47 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5650 नमूद झाला आहे.