Onion Market: कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आणखी एक पाऊल उचलण्याची शक्यता? शेतकऱ्यांचे मात्र होणार नुकसान?

Ajay Patil
Published:
onion market price

Onion Market:- केंद्र सरकारच्या माध्यमातून जेव्हा कांद्यावर निर्यात बंदी लादली गेली होती तेव्हा कांद्याच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर मात्र आता या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सरकारने निर्यात बंदी उठवली परंतु निर्यात शुल्कासारख्या काही अटी जैसे थे ठेवल्यामुळे या निर्यातबंदी उठवण्याचा शेतकऱ्यांना पाहिजे तितका फायदा होताना दिसून येत नाहीये.

ग्राहकांना कांदा दराच्या बाबतीत दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आटोकाट प्रयत्न करत असते व त्यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या खूप मोठे नुकसान होते. दर नियंत्रण ठेवण्यासाठी जे काही आजपर्यंत पावले उचलण्यात आली त्यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशामध्ये कांद्याची कमतरता भासू नये यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याकरिता कांद्याचे विकिरण करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

 कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे आणखी एक पाऊल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून कांद्याचे दर नियंत्रणात राहावे याकरिता जे काही पावले उचलण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून आता  एक लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याकरिता कांद्याचे विकिरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असून ही माहिती एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेली आहे.

2023-24 या वर्षांमध्ये पावसाची कमतरता होती व त्यामुळे इतर पिकांसोबत कांद्याच्या उत्पादनात देखील कमालीचे घट आली. महाराष्ट्रात तसेच आंध्र व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये कांद्याच्या उत्पादनामध्ये 16 टक्यांची घसरण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे देशांतर्गत कांद्याचे घटते उत्पादन लक्षात घेऊन सरकारने कांद्याची साठवणूक करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली असून कांदा जास्त दिवस खराब न होता टिकावा

याकरिता मोठ्या प्रमाणावर विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी दिली आहे. याकरिता आता ज्या भागांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते अशा परिसरात सरकारकडून 50 विकीरण केंद्राचा शोध घेतला जात असून

जर असं झाले तर यावर्षी एक लाख टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया केली जाईल व तो साठवला जाईल अशी माहिती देखील समोर आली. तसेच एनसीसीएफ व नाफेडला देखील पाच लाख टन कांद्याचे बफर स्टॉक करण्याकरिता ठाणे, नासिक आणि मुंबई सोनपत सारख्या भागांमध्ये विकिरण केंद्र शोधण्यास सांगितले आहे.

 शेतकऱ्यांचे मात्र होणार नुकसान

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लादल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते व आता निर्यात बंदी उठवली परंतु बफर स्टॉक करून सरकारच्या माध्यमातून कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे यामुळे कांद्याचे दर वाढणार नाहीत अशी स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता आहे व यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठ्या नुकसानीला सामोरे जाऊ लागू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe