कांद्याचे बाजार शुल्क एक रुपयावरून केले 50 पैसे! ‘ही’ बाजार समिती ठरली राज्यातील पहिली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नाशिक जिल्हा हा राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो व देशातील सर्वात महत्त्वाचे असे कांदा मार्केट हे नाशिक जिल्ह्यातच आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समिती या कांद्याच्या उलाढालीसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत.

यास नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून लेव्हीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर तापू लागला होता व यामुळे हमाल, मापारी आणि व्यापारी वर्गामध्ये वाद सुरू होते. त्यामुळे जिल्ह्यात खाजगी बाजार समितीची स्थापना व्हायला लागली होती

व या स्पर्धेला तोंड देण्याकरिता पिंपळगाव बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीवर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जे काही बाजार शुल्क आकारण्यात येते ते शेकडा एक रुपया वरून 50 पैसे करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे असा ऐतिहासिक निर्णय घेणारी पिंपळगाव बाजार समिती ही राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे.

 कांद्यावरील बाजार शुल्क 50 पैशांनी घटवले

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लेव्हीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यातील हमाल, व्यापारी आणि व्यापारी वर्गामध्ये वाद सुरू असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणि खाजगी बाजार समिती स्थापन व्हायला लागले आहेत. या खाजगी बाजार समितीच्या स्पर्धेला तोंड देता यावे याकरिता पिंपळगाव बाजार समितीच्या माध्यमातून कांद्याच्या उलाढालीवर जे काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून बाजार शुल्क आकारण्यात येते ते शेकडा एक रुपया वरून 50 पैसे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला

असून आमदार सभापती दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेमध्ये त्यासंबंधीचा ठराव देखील करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून माथाडी कामगार व कांदा व्यापाऱ्यांमध्ये लेव्हीच्या मुद्द्यावरून जो काही वाद होत आहे.त्यामुळे बाजार समितीचे कामकाज ठप्प झालेले होते.

या पार्श्वभूमीवर ज्या काही खाजगी बाजार समिती स्थापन झाल्या त्यामध्ये बाजार शुल्क शेकडा 50 पैसे आकारले जायचे. निम्मे बाजार शुल्क असल्यामुळे व्यापारी ही खाजगी बाजार समितीमध्ये कांदा खरेदीला प्राधान्य देतात. तसेच या बाजार समितीमध्ये माथाडी तसेच मापारी कामगार यामध्ये वाद नव्हता. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणावर घटली होती. त्यामुळे संचालकांच्या झालेल्या मासिक बैठकीमध्ये बाजार शुल्क एक रुपया वरून 50 पैसे करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

24 वर्षापासून होती एक रुपया फी

जेव्हापासून पिंपळगाव बाजार समितीची स्थापना झाली तेव्हापासून कांद्याच्या उलाढालीवर शेकडा एक रुपया प्रमाणे बाजार शुल्क आकारले जात होते. परंतु आता या वादानंतर खाजगी बाजार समिती स्थापन झाल्या होत्या त्याठिकाणी बाजार शुल्क 50 पैसे शेकडा आकारले जाते.

त्यामुळे व्यापाऱ्यांकडून देखील खाजगी बाजार समिती यांना प्राधान्य देण्यात येत होते. याकरिता या स्पर्धेत टिकून राहता यावे म्हणून पिंपळगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने या मार्केट स्पर्धेमध्ये टिकण्याकरिता 24 वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय घेतला.