वाचा आजचे कांदा व सोयाबीनचे बाजार भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  राहाता बाजार समितीत काल गुरुवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 4514 गोण्यांची आवक झाली.(Bajarbhav news) 

प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 3000 तर लाल कांद्याला 2800 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6341 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 4 हजार 514 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2500 ते 3000 रुपये तर लाल कांद्याला 2400 ते 2800 असा भाव मिळाला.

कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1650 ते 2450 रुपये, लाल कांद्याला 1550 ते 2350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 800 ते 1600 रुपये तर लाल कांद्याला 600 ते 1500 भाव मिळाला.

गोल्टी उन्हाळी कांद्याला 2100 ते 2300 रुपये व लाल कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 700 रुपये व लाल कांद्याला 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 4 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 41 ते 53 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 26 ते 40 रुपये असा भाव मिळाला.

डाळिंब नंबर 3 ला 16 ते 25 रुपये तर डाळिंब नंबर 4 ला 5 ते 15 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनची राहाता येथील मुख्य आवारात 23 क्विंटल आवक झाली.

सोयाबीनला कमीत कमी 6224 रुपये तर जास्तीत जास्त 6341 रुपये व सरासरी 6275 इतका भाव मिळाला. मकाला 1521 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले.