Soybean Bajar Bhav : सोयाबीनने केली निराशा! आज आज पण सोयाबीन पाच हजाराच्या खाली, वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला (Soybean Crop) गेल्या काही महिन्यांपासून पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजारभाव (Soybean Rate) मिळत आहे. खरे पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक बाजारभाव (Soybean Market Price) मिळाला होता.

त्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीचा (Soybean Farming) प्रयोग केला. मात्र शेतकऱ्यांचा (Farmer) हा प्रयोग फसला असून सोयाबीनने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या आशेवर पाणी फिरले आहे. सध्या बाजारात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी बाजार भाव मिळत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला हमीभावापेक्षा देखील कमी बाजार भाव मिळतं आहे.

यामुळे उच्चांकी बाजार भाव मिळेल ही सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची आशा फोल ठरली आहे. तसेच जाणकार लोकांनी यावर्षी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सहज बाजार भाव मिळणार असल्याचे सांगितले असल्याने निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची पायाखालची जमीन सरकली आहे.

दरम्यान राज्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे यामुळे उत्पादनात देखील घट होणार आहे. उत्पादनात घट होऊन देखील सोयाबीन बाजार भाव वाढत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण सोयाबीन बाजार भावाची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनचे तीन हजार क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4175 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 860 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4510 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज 460 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 237 क्‍विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 650 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसीमध्ये आज 1560 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 861 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4780 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 2253 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 878 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 305 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा अभिमान बाजार भाव मिळाला असून 5126 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4,888 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज लोकल सोयाबीनची 930 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 700 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 675 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 965 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 156 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4623 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 160 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 700 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज दोन हजार 400 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 141 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 1037 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 370 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनचे 324 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 752 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 880 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 875 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5151 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5013 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- उमरखेड एपीएमसीमध्ये आज 230 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज 548 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 952 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4525 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.