Soybean Bajar : सोयाबीन दरात स्थिरता ! वाढणार का भाव ?

Soybean Bajar : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. याची शेती ही महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागात पाहायला मिळते. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

विशेष म्हणजे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कारण की गेल्या वर्षी सोयाबीनला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळाला, यामुळे यावर्षी देखील चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी केली. 

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र या हंगामात सुरुवातीपासून बाजार भाव दबावात आहेत. मध्यंतरी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सरासरी दर मिळू लागला होता. मात्र आता दरात मोठी घसरण झाली असून सोयाबीनला अवघा साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. सोयाबीन लिलावासाठी विशेष प्रसिद्ध लातूर एपीएमसीमध्ये देखील सोयाबीनला कमी दर मिळत आहे. विशेष म्हणजे लातूरमध्ये सोयाबीनची आवक घसरली तरीदेखील दरात वाढ झालेली नाही. 

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या एपीएमसीमध्ये सोयाबीनचे भाव हे साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल वरच थांबलेत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की शनिवारी झालेल्या लिलावात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9171 क्विंटल आवक होती. त्या दिवशी झालेल्या लिलावा 5,331 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान तर सोयाबीनला मिळाला असून 5799 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 5550 नमूद झाला आहे. विशेष म्हणजे शनिवारी झालेल्या लीलावात आवक मध्ये मोठी घसरण होती. 

तरीदेखील दरात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान जाणकार लोकांनी यावर्षी सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यानच भाव मिळणार असल्याचे सांगितले आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शेतकरी बांधवांनी सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळेल तेव्हा सोयाबीन विक्री करू असं ठरवलं. परिणामी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली. मात्र आता दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात अजून घसरण होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता घरातील सोयाबीन बाजारात दाखल होऊ लागल आहे. 

तसेच चीनमध्ये कोरोना वाढू लागल्याने याचा प्रादुर्भाव आपल्याकडे पण होऊ शकतो आणि बाजारावर परिणाम होऊ शकतो यामुळे देखील शेतकरी सोयाबीन विक्री करत आहेत. विशेष म्हणजे चीन हा सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे अशा परिस्थितीत त्या ठिकाणी आलेला कोरोना हा कुठे ना कुठे शेतमालाचे भाव पाडण्यासाठी कारणीभूत राहणार आहे. 

जाणकार लोक देखील या गोष्टीला दुजोरा देत आहेत मात्र जाणकार लोकांनी यामुळे मोठ्या प्रमाणात दरात घसरण होणार नाही हे देखील नमूद केले आहे. जाणकार लोकांनी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजार राहणार असल्याचं भाकीत वर्तवल आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी विक्री करताना संपूर्ण सोयाबीन विकू नये तसेच संपूर्ण सोयाबीन साठवण करून ठेवू नये. अर्थातच टप्प्याटप्प्याने विक्री करावी, जेणेकरून त्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही.