Soybean Bajarbhav : चीनमुळे सोयाबीनला येणार अच्छे दिन ! चीन मोठ्या प्रमाणात भारतीय सोयाबीनची आयात करणार ; भारतात सोयाबीनचे दर विक्रमी वाढणार

Soybean Bajarbhav : भारतात सध्या सोयाबीनचा हंगाम प्रगतीपथावर आहे. सोयाबीनचा हंगाम भारतात आणि अमेरिकेत सोबतच सुरू होतो. यावर्षी भारतात सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे तर अमेरिकेतही सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अमेरिकेत सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे. तसेच भारतात देखील काही जाणकार लोकांकडून पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी राहणार असल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने नमूद केले आहे.

दरम्यान, आता उद्योग जगताचे लक्ष ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या सोयाबीन उत्पादनाकडे लागले आहे. मात्र ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये आत्ता सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. तसेच यावर्षी चीनमध्ये तेलबिया उत्पादन वाढीसाठी चीन सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनच्या सोयाबीन उत्पादनात देखील वाढ होणार आहे. मात्र असे असले तरी चीन हा सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा वापर केला जातो.

Advertisement

चीन सरकारच्या मते यावर्षी सोयाबीनची आयात 98 दशलक्ष टणांपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे चीनकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन जगातून आयात होणार आहे. जगातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांकडून चीन सोयाबीन आयात करत असतो. भारतातून देखील चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे आयात होऊ शकते. अशा परिस्थितीत याचा देशांतर्गत सोयाबीन बाजार भावात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. सद्यस्थितीत देशाअंतर्गत सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे.

सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीच्या तुलनेत सध्या मिळत असलेला दर हा चांगला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनला अजूनही कमी बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन दरात अजून वाढ इच्छा होण्याची आहे. तसेच जाणकार लोकांनी देखील यावर्षी सोयाबीनला सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल असे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सोयाबीनची विक्री करताना सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटलचा दर गृहीत धरून सोयाबीनचे टप्प्याटप्प्याने विक्री करत रहावे असे आवाहन देखील जाणकारांकडून केले जात आहे.

Advertisement