Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’मुळे सोयाबीन दरात वाढ होणार ; तज्ञांचा अंदाज

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन बाजारभावात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. या हंगामात सोयाबीनला मात्र चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा सुरुवातीला बाजार भाव मिळत होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र तदनंतर सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली आहे. आता चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला विशेषता बिजवाईच्या सोयाबीनला विक्रमी बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

एका वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात बिजवाईचे सोयाबीन खरेदीसाठी कंपनीकडून मोठी बोली लावली जात आहे. कंपन्यांकडून बिटवायचे सोयाबीन तब्बल 7000 रुपये भरके कमल ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खरेदी केले जात आहे. बियाण्यासाठी उपयुक्त असलेल्या सोयाबीनचा कंपनीकडून मोठी मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

मात्र असे असले तरी मिलचे सोयाबीन अजूनही साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दरापर्यंतच खरेदी होत आहे. यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे बियाण्याचे सोयाबीन उपलब्ध आहे अशाच शेतकरी बांधवांना सध्या फायदा मिळत असल्याचे चित्र आहे. मिलच्या सोयाबीनला या संपूर्ण आठवड्यात साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. येत्या आठवड्यात देखील असाच बाजार भाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरुवातीला 4000 रुपये प्रति क्विंटल त्या साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल असा सोयाबीनला दर मिळत होता. मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन तेलाची बाजारात मागणी वाढल्यानंतर सोयाबीनची देखील मागणी वाढली आणि सोयाबीनला चांगला दर मिळू लागला. दिवाळी सणाच्या दिवसात महाराष्ट्रात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळाला होता.

मात्र तदनंतर पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात घसरण झाली आणि आता सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. बिजवाईच्या सोयाबीनला मात्र अजूनही चांगला दर मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या हंगामात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. दरम्यान शेतकरी बांधवांनी देखील दरवाढीच्या आशेने सोयाबीनची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यात सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो याकडे जाणकार लोकांसमवेत शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे.