Soybean Bajarbhav : सोयाबीनची सहा हजाराकडे वाटचाल ! ‘या’ बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील सर्वाधिक दर ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो खरं पाहता या हंगामात सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागला आहे. दरम्यान आता सोयाबीन बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे.

आज सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5590 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. हा बाजार भाव गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सर्वोच्च असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान राज्यात आज 4700 प्रतिक्विंटल ते 5,381 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

निश्चितच सरासरी बाजारभावात देखील वाढ झाली आहे. दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेला सोयाबीन बाजार भाव त्यांच्या अपेपेक्षप्रमाणे नसून त्यांना सोयाबीन बाजारभावात अजून वाढ होण्याची आशा आहे. शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मोठे मुश्कील आहे. अशा परिस्थितीत बहुतांशी शेतकरी बांधव सोयाबीनची साठवणूक करणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी यावर्षी सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी देखील 6000 रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी ध्यानात ठेवून सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री केली पाहिजे यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही.

सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सर्वच सोयाबीन साठवून ठेवला आणि भविष्यात भाव वाढ झाली नाही, तसेच सर्व सोयाबीन आता विक्री केला आणि भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली तर त्यांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी बाजारपेठेतील स्थितीचा आढावा घेत सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री केली तर त्यांचा यामध्ये फायदा होऊ शकतो. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजारभाव सविस्तर.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/11/2022
अहमदनगर क्विंटल 2136 4200 5200 4700
अमरावती क्विंटल 3 5100 5450 5275
जळगाव क्विंटल 289 4700 5050 5000
उदगीर क्विंटल 6200 5350 5412 5381
कारंजा क्विंटल 4000 4650 5300 5010
मोर्शी क्विंटल 1350 4600 5275 4937
सोलापूर काळा क्विंटल 674 3600 5370 4900
अमरावती लोकल क्विंटल 20685 4650 5064 4857
नागपूर लोकल क्विंटल 6732 4300 5311 5038
हिंगोली लोकल क्विंटल 1800 4655 5590 5122
ताडकळस नं. १ क्विंटल 185 4600 5221 4800
नेवासा पांढरा क्विंटल 45 5200 5200 5200
लातूर पिवळा क्विंटल 17464 4900 5616 5330
अकोला पिवळा क्विंटल 6875 3500 5565 5000
यवतमाळ पिवळा क्विंटल 1723 4800 5350 5075
चिखली पिवळा क्विंटल 3944 4750 5500 5125
बीड पिवळा क्विंटल 639 3501 5301 4957
पैठण पिवळा क्विंटल 15 4500 4890 4751
कळमनूरी पिवळा क्विंटल 40 5000 5000 5000
चाळीसगाव पिवळा क्विंटल 22 4550 5200 4751
भोकर पिवळा क्विंटल 376 4200 5201 4700
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 1273 4400 5200 4800
जिंतूर पिवळा क्विंटल 441 4801 5351 5050
मलकापूर पिवळा क्विंटल 2000 4050 5400 4900
परतूर पिवळा क्विंटल 791 4400 5270 5200
गंगाखेड पिवळा क्विंटल 22 5100 5200 5150
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 300 3500 5100 4800
नांदगाव पिवळा क्विंटल 128 4501 5334 5001
केज पिवळा क्विंटल 990 5100 5300 5200
किनवट पिवळा क्विंटल 121 4950 5100 5000
सेनगाव पिवळा क्विंटल 400 4200 5200 4600
पुर्णा पिवळा क्विंटल 525 4900 5271 5150
पाथरी पिवळा क्विंटल 764 4000 5400 4761
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 230 4600 5200 4950
उमरखेड पिवळा क्विंटल 570 4800 5000 4900
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 330 4800 5000 4900
पुलगाव पिवळा क्विंटल 273 4400 5215 4900
कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 400 4350 5200 4750
सोनपेठ पिवळा क्विंटल 1122 4051 5351 5191