Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव सहा हजारावर ! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ; वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : दिवाळीनंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी प्रथमच एक आनंदाची आणि अतिशय गोड बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उचांकी  बाजार भाव मिळाला होता. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. यावर्षी एक ऑक्टोबर रोजी सोयाबीनचा हंगाम सुरू झाला मात्र तेव्हापासून ते आत्तापर्यंत सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावला आहे.

गेल्यावर्षी सोयाबीनला संपूर्ण हंगामभर सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता. एवढेच नाही तर सोयाबीन हंगाम सुरू झाला त्यावेळी गेल्या वर्षी सोयाबीनला तब्बल 11 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता.

मात्र त्यानंतर केंद्र शासनाने सोयाबीन आयातीला परवानगी दिल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात घसरन झाली होती. मात्र असे असले तरी गेल्यावर्षी हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीन बाजार भाव 6,000 प्रतिक्विंटलच्या आसपास राहिले होते. मात्र यावर्षी सोयाबीन हंगाम सुरू होऊन तब्बल एक महिना उलटला तरीदेखील सोयाबीनला अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते यावर्षी सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू झाला आणि व्यापाऱ्यांनी नवीन सोयाबीन मध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत सोयाबीन बाजार भाव हाणून पाडले आहेत. मात्र असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

आज राज्यातील सोयाबीनच्या लिलावासाठी प्रसिद्ध असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5701 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला असल्याने आगामी काळात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. निश्चितच सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची विस्तृत पण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/10/2022
औरंगाबाद क्विंटल 370 3050 5025 4037
हिंगोली लोकल क्विंटल 1100 4599 5370 4984
परांडा नं. १ क्विंटल 7 4850 5000 4850
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 848 2501 5231 5051
अकोला पिवळा क्विंटल 3127 3720 5701 4800
यवतमाळ पिवळा क्विंटल 1133 4400 5200 4800
चिखली पिवळा क्विंटल 1030 4250 5200 4725
बीड पिवळा क्विंटल 563 3500 5150 4731
वाशीम पिवळा क्विंटल 6000 4600 5301 5000
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 1500 4550 5200 4950
पैठण पिवळा क्विंटल 35 3300 4900 4650
कळमनूरी पिवळा क्विंटल 50 5000 5000 5000
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 924 4000 5000 4500
जिंतूर पिवळा क्विंटल 318 4400 5201 5015
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 7400 4250 5135 4755
परतूर पिवळा क्विंटल 829 3900 5100 5050
गंगाखेड पिवळा क्विंटल 15 5000 5200 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 235 3500 5000 4500
मंठा पिवळा क्विंटल 217 4400 5150 4800
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 344 4450 5180 4815
मुरुम पिवळा क्विंटल 654 4300 5173 4736
उमरगा पिवळा क्विंटल 161 4300 4950 4911
पांढरकवडा पिवळा क्विंटल 100 4800 5000 4900
कोर्पना पिवळा क्विंटल 60 4300 4500 4400
कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 90 4485 4900 4650
सोनपेठ पिवळा क्विंटल 408 4351 5223 4870
देवणी पिवळा क्विंटल 86 4800 5526 5163