Soybean Bajarbhav : बातमी कामाची ! सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सोयाबीनची विक्री करावी की नाही? वाचा तज्ञांचे मत

Soybean Bajarbhav : सोयाबीन हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. मात्र या हंगामात सोयाबीन दर सुरुवातीपासूनच दबावत आहेत. खरं पाहता गेल्यावर्षी सोयाबीन बाजार भाव चांगलेच तेजीत होते. गत हंगामात सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनला 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला होता.

नंतर मात्र केंद्र शासनाने सोया पेंड आयातिला परवानगी दिल्यामुळे सोयाबीन दरात घसरण झाली होती. मात्र तरी देखील गेल्या वर्षी सोयाबीन बाजार भाव 6000 रुपये प्रति क्विंटल ते सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहिला होता. यावर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावात आहेत. आता मात्र सोयाबीन दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव सोयाबीनला चांगला दर मिळण्याची वाट पाहत आहेत. खरं पाहता दिवाळीपूर्वी सोयाबीनला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत होता मात्र आता गेल्या दोन आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात किंचित अशी वाढ पाहायला मिळत आहे.

दिवाळीपूर्वी सोयाबीनचे बाजार भाव ५ हजाराच्या आत होते मात्र आता सोयाबीन दरात मोठी वाढ झाली असून सोयाबीनला 5400 प्रतिक्विंटल ते पाच हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजार भाव मिळत आहे. मात्र सरासरी बाजार भाव देखील साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आले असल्याचे चित्र आहे.

दिवाळीला मिळत असलेल्या दरासोबत सध्याच्या दराची तुलना केली असता सध्या सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळत आहे. मात्र अद्याप गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीनला कमी दर आहे. यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव सोयाबीनची विक्री करावी की नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. दरम्यान सोयाबीनला अधिक दर मिळेल या हेतूने आता सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात थांबवली आहे. तसेच भविष्यात आवक यापेक्षा कमी झाली तर सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या सोयाबीन दराची स्थिती पाहता आणि भविष्यातील मागणी पाहता सोयाबीन बाजार भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना शक्य असेल त्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवण्यास काही हरकत नाही. बाजारात भविष्यात आवक कमी झाल्यास सोयाबीन दर वाढू शकतात. एकंदरीत काय जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री केली तर त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे. सर्व सोयाबीन विक्री केला आणि भविष्यात सोयाबीनचे दर वाढले तर शेतकरी बांधवांना याचा तोटा होऊ शकतो. अशा परिस्थितीत सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.