Soybean Bajarbhav : एका रात्रीतच सोयाबीन बाजार भावात पाचशे रुपयांची घसरण ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात रोजाना चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) पाचशे रुपयांची वाढ झाली होती. काल पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीन विक्री होत होता. मात्र आज सोयाबीनच्या बाजारभावात पाचशे रुपयांची घसरण झाली असून सोयाबीन पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे.

सोयाबीनच्या बाजारभावात कमालीची चढ-उतार होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव संभ्रमात सापडले आहेत. दरम्यान यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना आलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचा दर्जा खालावला आहे. शिवाय आता काढणी होत असलेला सोयाबीनमध्ये अधिक आद्रता असल्याने अशा सोयाबीनला बाजारात कमी बाजार भाव मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान पावसामध्ये सापडलेला सोयाबीन अधिक काळ साठवून ठेवता येणे शक्य नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव सोयाबीनची कारणे झाल्यानंतर लगेचच सोयाबीन विक्री करत असल्याचे चित्र आहे. शेतकरी बांधव सध्या खेडा खरेदीमध्ये सोयाबीन विकत आहेत. यामुळे बाजारापेक्षा सोयाबीनला कमी दर मिळत आहे.

दरम्यान काल सोयाबीनच्या बाजारभावात चांगली वाढ झाली होती मात्र आज पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव सविस्तर.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/10/2022
उदगीर क्विंटल 4600 5200 5260 5230
कारंजा क्विंटल 8000 4350 5100 4675
श्रीरामपूर क्विंटल 92 4600 4900 4750
सेलु क्विंटल 282 4200 4900 4500
तुळजापूर क्विंटल 460 5100 5100 5100
राहता क्विंटल 67 4300 5180 4750
धुळे हायब्रीड क्विंटल 26 4855 5220 4855
सोलापूर लोकल क्विंटल 627 4000 5115 4775
नागपूर लोकल क्विंटल 798 4200 5076 4857
हिंगोली लोकल क्विंटल 1560 4280 5205 4742
परांडा नं. १ क्विंटल 12 4950 4950 4950
वडूज पांढरा क्विंटल 200 5000 5200 5100
अकोला पिवळा क्विंटल 4138 3700 5215 4900
चोपडा पिवळा क्विंटल 25 4900 5151 5151
बीड पिवळा क्विंटल 696 3400 5051 4703
वाशीम पिवळा क्विंटल 6000 4650 5250 5000
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 2700 4650 5150 4950
पैठण पिवळा क्विंटल 33 3950 4700 4500
भोकरदन पिवळा क्विंटल 80 4500 5000 4800
भोकर पिवळा क्विंटल 1086 3000 5104 4052
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 7200 4305 5125 4725
शेवगाव पिवळा क्विंटल 14 4350 4700 4700
परतूर पिवळा क्विंटल 492 4376 5030 4900
गंगाखेड पिवळा क्विंटल 23 5000 5200 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 260 3500 5000 4600
तळोदा पिवळा क्विंटल 4 4500 5100 5000
किनवट पिवळा क्विंटल 120 4800 5000 4950
मुखेड पिवळा क्विंटल 100 5000 5175 5100
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 110 4311 5001 4700
पांढरकवडा पिवळा क्विंटल 65 4700 4825 4775