Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी सोयाबीनला मिळतोय 7,800 रुपये प्रति क्विंटलचा दर ; वाचा खरी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

साहजिकच या दोन्ही राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून असते. दरम्यान आता या दोन्ही राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. मध्यप्रदेशमध्ये सोयाबीनला 6900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळत आहे.

तर इकडे महाराष्ट्रात सोयाबीनला तब्बल 7800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र आहे. निश्चितच संपूर्ण हंगामभर दबावत असलेले सोयाबीन बाजार भाव आता वाढत असताना शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. दरम्यान कृषी क्षेत्रातील काही जाणकार लोकांनी येत्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रात सध्या सोयाबीन दरात मोठी वाढ झाली आहे. बिजवाईच्या सोयाबीन दरात तब्बल दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतची वाढ झाली आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार सातारा मध्ये बीजवाईच्या सोयाबीनला 7800 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजारभाव मिळाला असून किमान बाजारभाव 5,300 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे.

बाजारातील हे चित्र पाहता सोयाबीनला लवकरच आठ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक बाजार भाव मिळणार असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. निश्चितच सोयाबीनच्या बाजार भावात झालेली ही वाढ शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते, बिजवाईच्या सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळत आहे मात्र तूर्तास मिलच्या सोयाबीनला मिळत असलेला दर अजूनही खूपच कमी आहे. मात्र बिजवाईच्या सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने भविष्यात मिलच्या सोयाबीनला देखील चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.