Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चांदी ! सोयाबीन दरात तेजी कायम ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajarbhav : केंद्र शासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी खाद्यतेल तसेच तेलबियांवरील असलेले स्टॉक लिमिट काढून घेतले. स्टॉक लिमिट काढल्यामुळे तेलबियांचे दर बाजारात चांगलेच वाढू लागले. याचा सोयाबीन दरावर देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन दर पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. सोयाबीन दराने आता सहा हजार रुपयांचा टप्पा गाठला असून आज झालेल्या लिलावात लातूर एपीएमसीमध्ये सोयाबीनला सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटलचा कमाल बाजार मिळाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सरासरी बाजार भाव देखील साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक मिळू लागला आहे. निश्चितच सध्या सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. मात्र असे असले तरी गेल्यावर्षीपेक्षा कमी बाजार भाव सोयाबीनला मिळत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज बारा क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5265 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून कमाल बाजारभाव 5700 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5482 प्रति क्विंटल नमूद झाला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसी मध्ये आज 6 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज 3206 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजारभाव 5,770 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5478 रुपये प्रतिक्विंटल एवढा राहिला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1550 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5400 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5955 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5677 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी विशेष प्रसिद्ध लातूर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनचे सर्वाधिक आवक नमूद करण्यात आली. या एपीएमसी मध्ये आज 20 हजार 228 क्विंटल सोयाबीनआवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5452 प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 6300 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५८६० रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :– अकोला एपीएमसी मध्ये आज ५७८७ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4100 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5870 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5500 प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसी मध्ये आज 1560 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजारभाव 5850 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5505 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3974 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून कमाल बाजार भाव 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5250 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.