Soybean Market : चिंताजनक ! केंद्र शासनाच्या ‘या’ एका निर्णयामुळे सोयाबीन दरात घसरण

Soybean Market : यंदा हंगामाच्या सूरवातीपासून सोयाबीनला कमी दर मिळत आहे. सुरुवातीपासून बाजार दबावात असल्याने सोयाबीन उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी वायदे बाजार सुरू झाल्यानंतर सोयाबीन दरात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली होती.

यामुळे शेतकरी बांधव वायदेबंदीची शेवटची तारीख केव्हा येईल याकडे टक लावून पाहत होते. पण अशातच केंद्र शासनाने सोयाबीन समवेतच सात शेतमालावरील वायदे बंदी ही डिसेंबर 2023 पर्यंत कायम केली. या वायदेबंदीमुळे शेतमालाच्या दरात घसरण होईल अशी शेतकऱ्यांना शँका होती. दरम्यान जाणकार लोकांनी याचा काही विपरीत परिणाम होणार नाही असं सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच शेतकऱ्यांना पॅनिक सेलिंग करू नका असा सल्ला दिला आहे. निश्चितच जाणकार लोकांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये मानसिक दबाव पाहायला मिळत आहे. वायदे बाजारावरील बंदी कायम ठेवली असल्याने दरात मोठी घसरण होईल अशी शेतकऱ्यांना भीती आहे.

तर जाणकार लोक सांगत आहेत की सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन दरावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. जे सोयाबीन दर 200 ते 300 रुपये वाढले असते कदाचित ते होणार नाही. पण दरात मोठी घसरण होण्याची यामुळे होण्याची शक्यता नाही. दरम्यान याचे पडसाद बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहेत.

यामुळे व्यापाऱ्यांकडून मुद्दामून भाव पाडले जात आहेत की काय असावा लागतो शेतकरी उपस्थित करत आहेत. कारण की वासिम एपीएमसी मध्ये मिल क्वालिटी सोयाबीन आणि बिजवाईचे सोयाबीन दोघांना सारखाच दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार करण्यासाठी व्यापारी लोक ही टॅक्टिस युज करत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

22 डिसेंबर 2022 अर्थातच काल वासिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेले लिलावात सोयाबीनला 5685 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचे दर मिळाले. मिल क्वालिटी आणि बिजवाई कॉलिटी दोघं सोयाबीनला सारखाच दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी बांधव संभ्रमाअवस्थेत सापडले आहेत.

अशातच जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री करण्याचा सल्ला दिला असून यंदाच्या हंगामात सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी तर निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.