Soybean News : सोयाबीन बाजार अस्थिर ; पण असं झालं तर सोयाबीन दर वाढणार ; वाचा तज्ञांचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean News : गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला. यामुळे यंदा देखील सोयाबीन दरात तेजी राहील असा अंदाज होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळाला नाही शिवाय उत्पादनात देखील घट झाली.

आज देखील जागतिक बाजारात सोयाबीन दरातील अस्थिरता कायम होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात थोडेशे सोयाबीन दर वधारले परंतु देशांतर्गत बाजारात सोयाबीन दर आजही कायम होते. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात सोयाबीनचे दर वाढणार की नाही याबाबत संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. आज देशांतर्गत बाजारात सोयाबीनला 5200 ते 5500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांपासून 4300 प्रतिक्विंटल ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर सोयाबीनला मिळतोय. आज सोयाबीनला 14.76 डॉलर म्हणजेच 4500 प्रतिक्विंटल एवढा दर जागतिक बाजारात मिळाला. सहाजिकच देशांतर्गत बाजारात जागतिक बाजाराच्या तुलनेत अधिक दर मिळत आहे.

यामुळे जागतिक बाजारात सोयाबीन दर वधारत असले तरी देखील देशांतर्गत बाजारात दर कायम आहेत. ज्यावेळी जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात देशांतर्गत दरापेक्षा अधिक वाढ नमूद केली जाईल त्यावेळी देशांतर्गत सोयाबीन दर वाढतील असं सांगितलं जातं आहे. जाणकार लोकांच्या मते सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर पुढील काही दिवस कायम राहतील.

असं झालं तर सोयाबीन दर वाढतील

खरं पाहता अर्जेंटीना हा प्रमुख सोयाबीन उत्पादक देश आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर या देशात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतलं जातं. अर्जेंटीनामध्ये सोयाबीनचे अजून उत्पादन मिळालेले नसून त्या ठिकाणी सोयाबीनची नुकतीच काही दिवसांपूर्वी पेरणी झाली आहे. परंतु त्या ठिकाणी जे काही प्रमुख सोयाबीन उत्पादक प्रांत आहेत त्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे.

म्हणजेच दुष्काळाची परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवत आहे. अशा परिस्थितीत जर त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादन कमी झाले तर सोयाबीन दराला आधार मिळेल आणि देशांतर्गत देखील सोयाबीन बाजार भाव वाढतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच देशातून सोयापेंड निर्यात वाढली आहे.

यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळणार नाही असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यंदा सोयाबीनला किमान 5000 रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळेल असं सांगितलं जात आहे.

त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनची विक्री करताना पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळेल हे ध्यानात घेऊन सोयाबीन विक्री करण्याचा सल्ला दिला जात आहे.