Soybean Price : धक्कादायक ! सोयाबीन दरात मोठी घसरण ; ‘या’ एपीएमसीमध्ये मिळाला मात्र 2450 रुपये प्रति क्विंटलचा दर, बळीराजा हतबल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज अतिशय चिंतेची बातमी समोर आली आहे. खरं पाहता, काल परवा पर्यंत क्षेत्रातील जाणकार लोकांनी सोयाबीन दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.

कृषी तज्ञांच्या मते, आतापर्यंत चीनमध्ये कडक निर्बंध लादलेले होते मात्र तेथील जनतेने सरकारविरुद्ध मोर्चा बांधणी केली असल्याने सरकार नमले असून निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसात चीनमधून सर्व मुख्य शहरांमध्ये निर्बंध काढले जाणार आहेत.

अशा परिस्थितीत त्या ठिकाणी मार्केट पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये सोयाबीनची मागणी वाढणार आहे. खरं पाहता चीन हा सोयाबीनचा प्रमुख ग्राहक आहे.

सोयाबीन व्यतिरिक्त चीन मध्ये कापसाची देखील मोठी मागणी असते. कापूस आणि सोयाबीन ही जागतिक कमोडिटी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मागणीवर सोयाबीन आणि कापसाचे दर अवलंबून असतात. यामुळे जागतिक बाजारपेठेत घडत असलेले ही घडामोड सोयाबीन दरासाठी पूरक ठरणार होती.

चीनमध्ये निर्बंध शिथिल झाल्यास सोयाबीनची मागणी मोठी वाढणार होती त्यामुळे सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता होती. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाचे बाजार भाव देखील वाढत होते. पामतेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश अर्थातच मलेशियामध्ये पाम तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत.

पामतेलाचे दर वधारले की सोयातेलाच्या दराला नेहमीच आधार मिळत असतो. म्हणजे सोयातेलाचे बाजार भाव वाढण्याची शक्यता बनत असल्याने जाणकार लोकांनी सोयाबीन बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र जाणकार लोकांनी वर्तवलेला हा अंदाज आज फोल ठरला आहे.

आज राज्यातील एका एपीएमसी मध्ये सोयाबीनला अवघा 2450 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. आज अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील सर्वात कमी बाजारभावाची नोंद झाली आहे. या एपीएमसीमध्ये आज 250 क्विंटल सोयाबीन आवक झाली होती.

आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2450 रुपये नमूद झाला आहे.

इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र आज सोयाबीन दर काल सारखेच स्थिर होते. राज्यातील इतर एपीएमसीमध्ये सरासरी दराचा विचार केला असता आज सोयाबीनला 4800 रुपये प्रतिक्विंटल ते 5600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे.