Soybean Price Hike : सोयाबीन दरात खरच वाढ होणार का ? काय म्हणताय तज्ञ

Soybean Price Hike : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र सोयाबीन बाजारभावाचीं चर्चा पाहायला मिळत आहे. खरं पाहता गेल्या महिन्यात साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल बाजारभावावर आणि सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री होणारा सोयाबीन अचानक पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री होऊ लागला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान काल जागतिक बाजारपेठेत सोयाबीन सोयाबीन आणि सोयातेलच्या दरात चांगलीच वाढ पाहायला मिळाली. याचा परिणाम मात्र देशांतर्गत सोयाबीन दरावर झाला नाही.

काल झालेल्या लिलावात सोयाबीनला 5200 ते 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला तर प्रक्रिया प्लांटचे दर हे थोडेसे अधिक होते. दोनशे रुपयांचा फरक पाहायला मिळाला. म्हणजे प्रक्रिया प्लांटचे बाजार भाव 5700 प्रतिक्विंटलच्या आसपास होते. दरम्यान जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोया उत्पादनाची वाढती मागणी आणि दर लक्षात घेता भविष्यात देशांतर्गत सोयाबीन दर वधारू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

Advertisement

दरवाढ होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे

येत्या काही दिवसात बाजारभावात वाढ होणार आहे कारण की जागतिक बाजारात बाजारभावात सुधारणा झाली आहे. याशिवाय सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आणि खरेदीदार अर्थातच चायनामध्ये कोरोना निर्बंध शिथिल केले जात आहेत. परिणामी चीन मधून सोयाबीनची मोठी मागणी वाढणार असल्याचा दावा जानकारांकडून केला जात आहे. याव्यतिरिक्त प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्थातच अर्जेंटिनामध्ये दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे त्या ठिकाणी उत्पादनात भली मोठी घट होणार आहे. या घटकांचा परिणाम दरवाढीवर होणारा असून जागतिक स्तरावर ऑलरेडी त्याचा प्रभाव पाहायला मिळत आहे.

देशांतर्गत अजून सोयाबीन दरात वाढ होत नाहीये मात्र या सर्व घटकांचा एकंत्रित विचार केला असता आगामी काही दिवसात दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अजून एक मोठा घटक सोयाबीन दरवाढीसाठी कारणीभूत ठरणार आहे तो म्हणजे जैवइंधन म्हणून सोयातेल आणि पाम तेलाचा वापराला मिळत असणारी गती. अमेरिकाने सोयातेलचा जैवइंधन म्हणून वापर केल्यास सोयातेलाला आधार मिळणार आहे. याव्यतिरिक्त इकडे इंडोनेशियाने देखील आपल्या जैव इंधनात धोरणात बदल केला असून बी-35 नावाने एक धोरण तयार केल आहे.

Advertisement

या नावाचा अर्थ असा की आतापर्यंत जे इंडोनेशिया 30% एवढं पामतेल जैव इंधन म्हणून उपयोगात आणत होतं, ते इंडोनेशिया आता 35% एवढं पामतेल जैवइंधन म्हणून वापरणार आहे. अर्थातच 5% पामतेलाची उपलब्धता बाजारात कमी होणार आहे. तसेच यावर्षी मूळतः पामतेलाच उत्पादन कमी झाले आहे. या सर्वांचा एकत्रित विचार जर केला तर खाद्यतेलाला उभारी मिळणार आहे. खाद्यतेलाचे दर वाढले, म्हणजेच तेलबियाचे देखील बाजार भाव वाढतात. साहजिकच याचा सोयाबीन बाजारभावावर देखील सकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात येत आहे.

एवढे जरी घटक एकत्रितपणे सोयाबीन दर वाढीसाठी अनुकूल भासत असले तरी देखील सोयाबीन दर विक्रमी वाढणार आहेत आणि गेल्यावर्षी प्रमाणे साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल 9000 रुपये प्रति क्विंटल असा काही बाजार भाव मिळेल असे चित्र सध्यातरी पाहायला मिळत नाही. या हंगामात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळू शकतो असे काही जाणकार नमूद करत आहेत. या अमुक सरकारने धोरण बदलले, या तेलाचा जैवइंधन म्हणून वापर वाढवला, त्या तेलाचा जैवइंधन म्हणून वापर वाढवला त्याचा फार मोठा फरक काही पडताना दिसत नाही.

काहीसा फरक देशांतर्गत सोयाबीन दरावर पडत आहे, मात्र खूप काही असा बदल पाहायला मिळत नाहीये. यामुळे सोयाबीन उत्पादकांनी बाजारपेठेचा आढावा घेत आपल्याला परवडेल असा बाजारभाव मिळाला की सोयाबीनची विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. मात्र टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री करावी सर्व सोयाबीन एकदाच विकण्याची घाई नको. सोयाबीन साठवणूक केलं म्हणजे सोयाबीनचा दर्जा किंवा वजन यामध्ये घट होत नाही. निश्चितचं हे एक शाश्वत उत्पन्नाचं पीक आहे यामुळे चांगला दर मिळाला की मगच विक्री करायची असं देखील सांगितलं जात आहे.

Advertisement