Soybean Rate : सोयाबीन दरात मोठी घसरण! सोयाबीनची साठवणूक ठरणार का फायदेशीर? वाचा तज्ञ लोकांचे मत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate : सोयाबीनची महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात शेती पाहायला मिळते. हे एक नगदी पीक म्हणून ओळखल जात असून शाश्वत उत्पन्न मिळतं म्हणून याची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला असल्याने यंदा सोयाबीनची पेरणी थोडीशी वाढली आहे.

मात्र यावर्षी अगदी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावात आहेत. विशेष म्हणजे गेल्या पंधरवड्यापासून दरात मोठी घसरण झाली असून 500 ते 1000 रुपयांची घसरण नमूद झाली. यामुळे उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. खरं पाहता या हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

हाती अतिशय कवडीमोल उत्पादन मिळाले. यामुळे उत्पादन कमी झाले असले तरी देखील वाढीव दरातून याची भरपाई काढली जाईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र या हंगामात तसं पाहायला मिळालं नाही. गेल्या हंगामात 7000 रुपये प्रति क्विंटल ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर सोयाबीनला अगदी हंगामाच्या शेवटी पर्यंत भेटत होता.

सध्या सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. म्हणजेच सोयाबीन दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन हजाराची घट आहे. खरं पाहता गेल्या महिन्यात सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल वर विक्री होत होता. परंतु दरात अजून वाढ होईल आणि उत्पादनात झालेली घट भरून निघेल अशी आशा बाळगून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली.

याचा फायदा मात्र सध्या तरी होताना दिसत नाहीये. दरम्यान आता सोयाबीन वायदे डिसेंबर 2023 पर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे याचा देखील अप्रत्यक्ष दबाव बाजारावर राहणार असल्याचा काही जाणकारांचा अंदाज आहे. याशिवाय चायना मध्ये कोरोना दिवसेंदिवस वाढत असून त्या ठिकाणी सोयाबीनची मागणी कमी राहणार असल्याची भीती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे कुठे ना कुठे जागतिक बाजारात सोयाबीन दरात घसरण येईल आणि याचा फटका देशांतर्गत बाजारात बसेल, अशी ही भीती काही तज्ञांनी वर्तवली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीनला पाच हजार तीनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचे दर मिळत होते.

मात्र सध्या सोयाबीन 4700 प्रतिक्विंटल ते 5500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. साहजिकच दरवाढीच्या आशेने ठेवलेले सोयाबीन कवडीमोल दरात विकावा लागतो की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

दरम्यान आता भविष्यात सोयाबीनला काय दर मिळतो हे सर्वस्वी जागतिक बाजारावर डिपेंड राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तज्ञ लोकांकडून देखील सोयाबीनला भविष्यात काय दर मिळतो याबाबत स्पष्टपणे सांगण्यास नकार दिला जात आहे.