Soybean Rate : सब्र का फल मिठाही होगा ! सध्या सोयाबीन दरात घसरण, पण लवकरच ‘इतके’ वाढणार दर

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची शेती महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश म्हणजेच जवळपास सर्वच विभागात केली जाते. एकंदरीत काय या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिवाय गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्याने यंदा देखील शेतकऱ्यांना विक्रमी दराची आशा होती, यामुळे सोयाबीनचा यंदा पेरा देखील वाढला आहे. मात्र आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या आशाप्रमाणे सोयाबीनचा हंगाम राहिलेला नाही.

या हंगामात सोयाबीनचे दर कमालीचे दबावात असून चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोयाबीनच्या दरात सध्या घसरण सुरु असल्याने शेतकऱ्यांनी माल रोखून धरला आहे. परिणामी बाजारात आवक कमी झाली असून आवकेचा दरावर कोणताच विपरीत परिणाम होत नाहीये.

Advertisement

याउलट बाजारात आवक कमी असल्याने उद्योगाची गोची होत असून भविष्यात दरवाढीची शक्यता नाकारली जात नाहीये. म्हणजेच शेतकरी राजा स्वतःच बाजारभावात वाढ घडवून आणू शकतो.

हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनची बाजारात इंट्री झाली आणि दर तब्बल 15 टक्क्यांनी घसरले. मग काय शेतकऱ्यांनी आपला माल रोखून धरला आणि दरात चांगलीच वाढ झाली. बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपले.

मात्र सध्या सोयाबीन दरात पुन्हा एकदा घसरण सुरू झाली असून सोयाबीनला पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवनुक करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात सोयाबीन कमी प्रमाणात दाखल होत असल्याने प्रक्रिया उद्योगांची चांगलीच गोची होत आहे. परिणामी, बाजारात सोयाबीनच्या दराला यामुळे आधार मिळणार आहे.

Advertisement

सोयाबीन ही एक जागतिक कमोडिटी आहे. याचे क्रशिंग केल्यानंतर सोयापेंड आणि सोयातेल हे दोन उत्पादन तयार होतात. या उत्पादनांना जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत किती मागणी आहे, त्यांची दरपातळी काय आहे, यावर सोयाबीनचे दर ठरतात. सोयातेलाची पाम तेलाशी थेट स्पर्धा आहे. अशा स्थितीत पामतेलाच्या दरात वाढ झाल्यास त्याचा थेट फायदा सोयाबीनला होणार आहे.

मात्र, सोयापेंड निर्यातीच्यादृष्टीने फारसा उत्साह नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काही दिवसांपूर्वी सोयापेंडच्या दरातील पडतळ आल्यामुळे निर्यातीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी निर्यातीचा करार झाला होता. मात्र त्यानंतर निर्यातीचे करार फारसे वाढले नाहीत. त्यामुळेच सोयापेंडीच्या आघाडीवर फारसा आधार सध्या मिळत नाही. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील वाढ ही मर्यादित स्वरूपात राहील.

तसेच काही जाणकार लोकांनी, सध्या मलेशियामध्ये पामतेलाचे दर वधारत असल्याने याचा आधार सोयातेलाला मिळणार असून त्यामुळे सोयाबीन दरात अल्पशी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. एकंदरीत सध्या साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत असून भविष्यात 6000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दरवाढीच्या अशा तज्ञांकडून वर्तवली जात आहे. जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्री करताना 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव ध्यानात ठेवून सोयाबीनची विक्री करावी.

Advertisement