माहोल बदल रहा है ! सोयाबीन दरात सुधारणा ; ‘या’ ठिकाणी मिळाला हंगामातील सर्वोच्च दर ; वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate : आज महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज सोयाबीन दरात सुधारणा झाली आहे. वासिम एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.

यामुळे भविष्यात बाजारभावात अजून वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. जाणकार लोकांनी येत्या काही दिवसात चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार असून त्या ठिकाणी सोयाबीनची मागणी वधारण्याची शक्यता लक्षात घेता दरात वाढ होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

दरम्यान याचा परिणाम वासिम एपीएमसी मध्ये आज पाहायला मिळाला आहे. 30 नोव्हेंबर रोजी वाशीम एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला होता तर आज 6500 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.

म्हणजेच या एपीएमसीमध्ये सोयाबीन दरात साडेनऊशे रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आगामी काळात सोयाबीन दर वधारण्याची शक्यता निश्चितच नाकारले जात नाहीये. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या बाजार भावाविषयी चर्चा करणार आहोत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 287 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 4650 रुपये नमूद झाला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1257 क्विंटल एवढी सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 5381 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद झाला आहे. सरासरी बाजार भाव 5250 नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 5500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला ५०५० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5460 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5325 रुपये नमूद झाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 600 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 5431 रुपये आणि तसेच सरासरी बाजार भाव 5345 नमूद झाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 630 क्विंटल एवढी लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5,075 रुपये नमूद झाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 170 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4802 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अन सरासरी बाजार भाव 5311 एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1130 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लीलाबाद या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4899 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5199 नमूद झाला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1580 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 प्रतिक्विंटल एवढा कमाल तर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 5100 रुपये नमूद झाला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6527 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 5200 नमूद झाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसी मध्ये आज 13152 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5600 रुपये नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2488 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4765 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5460 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव ५२५० नमूद झाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1155 क्विंटल एवढी सोयाबीन आवक झाली. झालेल्या लिलावा द्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान ; 5345 रुपये कमाल आणि 5172 सरासरी बाजारभाव मिळाला आहे.

वासिम कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 6000 रुपये नमूद झाला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3600 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४९९० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 5305 नमूद झाला आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 122 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5200 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 4850 नमूद झाला आहे.

बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 693 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4850 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5425 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5200 रुपये नमूद झाला आहे.