Soybean Rate : खरं काय ! इंडोनेशियाच्या ‘या’ धोरणामुळे सोयाबीन दरात होणार मोठी वाढ

Soybean Rate : गेल्या काही दिवसांपूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होणारा सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल वर विक्री होत आहे. यावर्षी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत उत्पादनात घट आणि बाजारात मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. दरम्यान आता जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले आहे.

जाणकारांच्या मते इंडोनेशियामध्ये जैवइंधन म्हणून पाम तेलाचा वापर वाढणार आहे. परिणामी पाम तेलाचे दर वधारणार आहेत. सोयातेल आणि पामतेलाच्या दरामध्ये कायमच स्पर्धा राहते अशा परिस्थितीत याचा फायदा सोया तेलाला मिळणार आहे. म्हणजेच सोयाबीन दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement

या तयार होत असलेल्या परिस्थितीमुळे सोयाबीन दर दीडशे ते दोनशे रुपये प्रतिक्विंटल वाढतील असा जाणकारांचा अंदाज आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की प्रमुख पामतेल उत्पादक इंडोनेशियामध्ये सध्या जैवइंधनात ३० टक्के पामतेल वापरलं जात आहे. मात्र आता इंडोनेशियाने ३५ टक्के तेल वापरण्याचे उद्दीष्ट ठेवलं असून याला बी ३५ असे नाव देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे याबाबत इंडोनेशिया सरकार दरबारी हालचाली तेच झाल्या आहेत. इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी ३५ टक्के पामतेल वापरासाठी तयार राहावे असं वक्तव्य दिल आहे. म्हणजेच आता पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वापर वाढला म्हणजेच उपलब्धता कमी होईल आणि दरात तेजी येईल.

दरम्यान यंदा जागतिक पामतेल उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे एकीकडे पामतेलाचा वापर वाढेल तर दुसरीकडे उपलब्धता कमी राहील म्हणून पाम तेल कडाडणार आहे. विशेष म्हणजे आज पामतेलात तेजी आली आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत बाजार अभ्यासकांनी या बदलत्यां परिस्थितीचा सोयाबीन दरावर सकारात्मक परिणाम होणार असल्याचे सांगितले आहे. या एकंदरीत परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीन दरात दोनशे रुपयांची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.