हसावं की रडावं ! आज सोयाबीन दर हमीभावापेक्षा अधिक ; पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate Maharashtra : सोयाबीनचीं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात याची पेरणी पाहायला मिळते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकावर अवलंबून असतात. मात्र याला जागतिक कमोडिटी म्हणून ओळखले जाते. यामुळे याच्या दरावर कायमच जागतिक बाजाराचा प्रभाव पडत असतो. याच्या दरावर आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या चढ-उताराचा मोठा पगडा राहतो.

यंदा याची प्रचिती शेतकऱ्यांना देखील आली आहे. यावर्षी सोयाबीन हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र असे असले तरी अजूनही याला अपेक्षित असा दर मिळत नाहीय. गेल्या हंगामात चांगला दर मिळाला असल्याने यंदा पिवळं सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा पेरा वाढला आहे. पण यंदा पिवळं सोन सुरवातीपासून चमकलं नाही.

गेल्या महिन्यात दरात थोडीशी सुधारणा झाली होती, जवळपास सहा हजार रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळत होता पण चालू महिन्यात सोयाबीन दरात मोठी घसरण झाली. भाव केवळ पाच हजार रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपले. परिणामी उत्पादक शेतकरी बांधव चिंतेत सापडला.

खरं पाहता, यावर्षी सोयाबीनच्या उत्पादकतेत हवामानाच्या लहरीपणामुळे घट झाली आहे. पण गेल्या हंगामात चांगला दर मिळाला असल्याने या हंगामात पेरणी वाढली आहे अशा परिस्थितीत उत्पादनात फारशी घट झाली नाही असा दावा काही जाणकारांनी केला आहे. म्हणजेचं शेतकरी बांधवांच्या वैयक्तिक उत्पादनात घट झाली आहे.

त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना सध्या मिळत असलेल्या दरात मालाची विक्री करणे परवडत नाही. निश्चितच सध्याचा भाव हा हमीभावापेक्षा अधिक आहे. शासनाने 4 हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव सोयाबीनला लावून दिला आहे.

यामुळे हमीभावापेक्षा जवळपास 700 ते 1000 रुपयांपर्यंत अधिक दर मिळत आहे पण वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेलं उत्पादन याचा विचार केला असता सध्याच्या भावात विक्री करणे उत्पादक शेतकऱ्यांना परवडत नाही. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 40 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4900 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5200 प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर पाच हजार रुपये नमूद करण्यात आला आहे.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- पैठण एपीएमसी मध्ये आज दोन क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज आलेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5165 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल आणि सरासरी दर एवढाच नमूद करण्यात आला आहे.