Today Soybean Price : शेतकऱ्यांवरील संकटाचीं मालिका कायम ! आता सोयाबीन दर हमीभावापेक्षा खाली ; वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today Soybean Price : सोयाबीन दरात वाढ होईल अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने व्हायरल होत आहेत. पण दरवाढ तर झालीच नाही याउलट दर खाली आले आहेत.

आज तर औरंगाबाद एपीएमसी मध्ये सोयाबीनला सरासरी दर 4312 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे किमान बाजार भाव अवघा तीन हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. दरम्यान शासनाने सोयाबीनला 4300 प्रतिक्विंटल एवढा हमीभाव लावून दिला आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन बाजार भाव हमीभावावर येऊन ठेपले आहेत. यंदा उत्पादन खर्चात वाढ झाली असल्याने अन तोकडे उत्पादन मिळाल असल्याने सोयाबीनचीं हमीभावात विक्री करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. निश्चितच सध्या सोयाबीन उत्पादक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मधील सोयाबीन दराची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 37 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 3450 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर पाच हजार 175 आणि सरासरी बाजार भाव 4312 नमूद झाला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या बाजारात आज 4500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5400 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5520 प्रती करून ठेवले एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5460 नमूद झाला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :– या बाजारात आज 3500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5090 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5445 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5300 नमूद झाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5100 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5455 प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी बाजारभाव 5301 नमूद झाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5,628 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5425 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि सरासरी बाजार भाव 5312 नमूद झाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 363 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5323 नमूद झाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 54 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5391 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5350 नमूद करण्यात आला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1039 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 45 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5175 नमूद झाला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2400 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5830 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5400 नमूद झाला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज 7378 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान ; 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी बाजार भाव 5350 नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5283 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5475 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5250 नमूद झाला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6401 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5300 नमूद झाला आहे.

मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2400 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ५०१० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5530 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5375 नमूद झाला आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- जामखेड एपीएमसी मध्ये आज 121 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5200 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर आणि 4850 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.